भारत अन् पाकिस्तान पुन्हा आमने-सामने येणार; सामना कधी खेळवला जाणार?; A टू Z माहिती
भारत विरुद्ध पाकिस्तान लाइव्ह स्ट्रीमिंग, एशिया कप 2025: आशिया चषक 2025 च्या स्पर्धेवर (Asia Cup 2025) बहिष्कार टाकण्याची धमकी मागे घेतल्यानंतर पाकिस्तानने 17 सप्टेंबर रोजी अखेरच्या साखळी सामन्यात कडवी झुंज दिलेल्या यूएईचा 41 धावांनी (Pak vs UAE) पराभव केला. याविजयासह पाकिस्तानने सुपर फोर फेरीत प्रवेश निश्चित केला. त्यामुळे 21 सप्टेंबर रोजी आता पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) आमनेसामने येणार आहेत. दरम्यान, 14 सप्टेंबर रोजी झालेल्या साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानचा 7 विकेट्सने पराभव केला होता. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने-सामने येणार आहेत. भारत आणि पाकिस्तानचा हा सामना कधी आणि कुठे होईल, सामना किती वाजता सुरू होईल आणि थेट प्रक्षेपण कुठे पाहता येईल, याबाबत जाणून घ्या…
भारत विरुद्ध पाकिस्तान हेड-टू-हेड (टी-20 फॉरमॅट)
एकूण सामने: 14
भारत विजयी: 11
पाकिस्तान विजयी: 3
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना कधी आणि कुठे खेळला जाईल?
भारत आणि पाकिस्तानचा सामना 21 सप्टेंबर रोजी खेळवला जाईल. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येईल.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना किती वाजता सुरू होईल?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर-4 चा सामना दुबई येथे भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल आणि नाणेफेक रात्री 7.30 वाजता होईल.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना कोणत्या चॅनेलवर थेट प्रसारित केला जाईल?
आशिया कप २०२५ साठी ब्रॉडकास्ट सोनी स्पोर्ट्स नेटवर्क आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खालील चॅनेलवर थेट प्रक्षेपित केला जाईल.
सोनी स्पोर्ट्स 1
सोनी स्पोर्ट्स 3 (हिंदी)
सोनी स्पोर्ट्स 4
सोनी स्पोर्ट्स 5
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना तुम्ही कोणत्या अॅपवर पाहता येणार?
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सोनी लिव्ह अॅप आणि वेबसाइटवर थेट प्रक्षेपित केला जाईल.
भारताचा संपूर्ण संघ- सूर्यकुमार यादव (कर्नाधर), शुबमन गिल, अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, अक्षर पटेल, जसप्रित बुमराह, वरुण चक्राबोर्टी, अर्शदीप सिंग, रिंगव सिंग.
पाकिस्तानचा संपूर्ण संघ- सलमान अली आगा (कर्नाधर), अबरार अहमद, फहीम अशरफ, फखर झमान, हॅरिस रौफ, हसन अली, हसन नवाज, हुसेन तालत, खुशदिल शाह, मोहम्मद हरीस, मोहम्मद नवाझ, मोहम्मद कनिष्ठ, साल्मान मोकिम.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.