भारत विरुद्ध पाकिस्तानचा हाय व्होल्टेज सामना; वर्ल्डकप विजेत्या खेळाडूने निवडली टीम इंडियाची चक

भारत प्लेइंग इलेव्हन विरुद्ध पाकिस्तान T20 विश्वचषक 2026 : भारत आणि नामीबिया यांच्यात झालेल्या दुसऱ्या लीग सामन्यात भारताने 93 धावांनी दणदणीत विजय मिळवला. टीम इंडियाचा हा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय ठरला. आता भारताचा तिसरा सामना रविवारी 15 फेब्रुवारी रोजी प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध रंगणार आहे. हा सामना कोलंबोमध्ये होणार असून, तेथील खेळपट्टी फिरकीपटूंसाठी पोषक मानली जात आहे. दरम्यान, माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण याने या महत्त्वाच्या सामन्यासाठी भारतीय संघात कोणत्या बदलांची गरज आहे, यावर आपले मत मांडले आहे.

कुलदीप यादवचा संघात समावेश करण्याची मागणी

स्टार स्पोर्ट्सवर बोलताना इरफान पठाणने सांगितले की, पाकिस्तानविरुद्ध भारताला प्लेइंग इलेव्हनमध्ये फार मोठे बदल करण्याची गरज नाही. मात्र, कोलंबोची परिस्थिती पाहता त्याने एका महत्त्वपूर्ण बदलाचा सल्ला दिला आहे. इरफानच्या मते, अर्शदीप सिंगच्या जागी कुलदीप यादवला संधी द्यायला हवी, कारण तिथे फिरकीला जास्त मदत मिळेल.

सलामी जोडीवर काय म्हणाला इरफान पठाण?

इरफानने सलामीच्या जोडीवर विशेष भाष्य केले. तो म्हणाला की, जर अभिषेक शर्मा पूर्णपणे तंदुरुस्त असेल, तर त्याने इशान किशनसोबत डावाची सुरुवात करावी. परंतु अभिषेक फिट नसेल, तर संजू सॅमसन हा सलामीसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. संजूने नामीबियाविरुद्ध चांगली फलंदाजी केली. जरी त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नसली, तरी त्याने मारलेले तीन षटकार त्याचा सकारात्मक ‘इंटेंट’ दर्शवतात, जो पाकिस्तानविरुद्ध महत्त्वाचा ठरेल.”

पाकिस्तानविरुद्ध इरफान पठाणने निवडलेली संभाव्य प्लेइंग 11 (Irfan Pathan Playing-11 VS Pakistan) : संजू सॅमसन/अभिषेक शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव.

भारत ७-१ ने आघाडीवर आहे (टी-२० विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान आमने-सामने)

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हेड-टू-हेड रेकॉर्डबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी एकूण 8 सामने खेळले आहेत. भारतीय संघाने टी-20 विश्वचषकाच्या जागतिक मंचावर आपल्या कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर वर्चस्व गाजवले आहे. 9 आवृत्त्यांमध्ये खेळल्या गेलेल्या 8 सामन्यांपैकी 7 विजयांसह भारताने आघाडी घेतली आहे, तर पाकिस्तानला फक्त एकदाच विजय मिळाला आहे, जेव्हा त्यांनी 2021 च्या आवृत्तीत दुबईमध्ये भारतीय संघाचा 10 गडी राखून पराभव केला होता.

टी-20 विश्वचषक 2026 साठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, इशान किशन, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग.

हे ही वाचा –

Abhishek Sharma : ‘माझं वजन कमी झालंय…’, IND vs PAK सामन्यापूर्वी अभिषेक शर्माचा धक्कादायक खुलासा; नेमकं घडलंय काय?

आणखी वाचा

Comments are closed.