टी-20 विश्वचषकात भारत अन् पाकिस्तान पुन्हा आमनेसामने?, जाणून घ्या संपूर्ण समीकरण

IND vs PAK अंतिम परिस्थिती T20 विश्वचषक 2026 : 2026 च्या टी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा महामुकाबल्याची शक्यता निर्माण झाली आहे. या स्पर्धेत पुन्हा भारत विरुद्ध पाकिस्तान असा थरार पाहायला मिळेल का? आता याचे उत्तर पाकिस्तानच्या कामगिरीवर अवलंबून आहे. सध्या, पाकिस्तान सुपर-8 गटात तिसऱ्या स्थानावर आहे आणि 28 फेब्रुवारी रोजी पल्लेकेले येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणारा त्यांचा श्रीलंकेविरुद्धचा सामना ‘करो या मरो’ असा असेल. सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पाकिस्तानला श्रीलंकेला किमान 65 धावांनी पराभूत करावं लागेल किंवा दिलेलं लक्ष्य 13 षटकांच्या आत गाठावं लागेल. तेव्हाच त्यांना न्यूझीलंडला मागे टाकता येईल.

जर पाकिस्तानने हे कठीण कोड पूर्ण केलं, तर स्पर्धेत पुन्हा एकदा भारताशी त्यांची टक्कर होण्याची शक्यता निर्माण होईल. दोन्ही संघ याआधी गट टप्प्यात आमनेसामने आले होते. त्या सामन्यात भारताने शानदार विजय मिळवला होता. ईशान किशनच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने पाकिस्तानचा 61 धावांनी पराभव केला होता.

भारत-पाक बाद फेरीत आमनेसामने? (भारत विरुद्ध पाकिस्तान T20 विश्वचषक अंतिम परिस्थिती)

पहिलं समीकरण असं आहे की, पाकिस्तान सुपर-8 मध्ये दुसऱ्या स्थानावर राहून उपांत्य फेरीत पोहोचला आणि भारत आपल्या गटात अव्वल राहिला, तर उपांत्य फेरीत दोन्ही संघांची गाठ पडू शकते. ही शक्यता कमी असली तरी क्रिकेटमध्ये काहीही अशक्य नसतं.

दुसरं आणि अधिक रोमांचक समीकरण म्हणजे… दोन्ही संघांनी आपापले उपांत्य सामने जिंकले, तर अंतिम फेरीत पुन्हा एकदा जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा रंगू शकते. भारत-पाकिस्तान अंतिम सामना म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणीच ठरेल.

पाकिस्तानसमोर मोठं आव्हान (Pakistan Semi-Final Qualification Scenario)

सध्या पाकिस्तानची स्थिती नाजूक आहे. सुपर-8 च्या गट-2 मध्ये दोन सामन्यांत एक गुणांसह ते तिसऱ्या स्थानावर आहेत, तर न्यूझीलंड तीन सामन्यांत तीन गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. श्रीलंका स्पर्धेबाहेर गेली असली तरी पाकिस्तानच्या स्वप्नांवर पाणी फेरण्याची ताकद त्यांच्यात आहे. आता साऱ्या क्रिकेटविश्वाची नजर पल्लेकेलेतील या निर्णायक सामन्याकडे लागली आहे. पाकिस्तान चमत्कार घडवून सेमीफायनलचं तिकीट मिळवणार का? याचं उत्तर मैदानावरच मिळणार आहे.

हे ही वाचा –

IND vs WI T20 World Cup 2026 : कोलकाताच्या ईडनवर वेस्ट इंडिजसमोर भारताचा भूतकाळ काय सांगतो? हा एक ट्विस्ट ठरवणार अंतिम चारचं भविष्य

आणखी वाचा

Comments are closed.