IND vs SA: प्रसिद्ध कृष्णाला वगळणार? तिसऱ्या वनडेत टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन मोठे बदल होण्याची शक्यता!

भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील एकदिवसीय (वनडे) मालिकेतील तिसरा आणि महत्त्वाचा सामना 6 डिसेंबरला विशाखापट्टणम (Vizag) येथे खेळला जाणार आहे. दुसऱ्या सामन्यात भारतीय गोलंदाज 359 धावांचे मोठे लक्ष्य वाचवण्यात अपयशी ठरले. या विजयासह, मालिका आता 1-1 अशी बरोबरीत आली आहे. त्यामुळे, अंतिम आणि निर्णायक सामन्यात भारतीय संघाच्या प्लेइंग-11 मध्ये दोन मोठे बदल पाहायला मिळू शकतात.

मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये फलंदाजीमध्ये फ्लॉप ठरलेल्या यशस्वी जयस्वालच्या (Yashsvi jaiswal) जागी टीम व्यवस्थापन तिलक वर्माला (Tilak Verma) संधी देऊ शकते. यशस्वी जयस्वाल बाहेर बसल्यास, ऋतुराज गायकवाडला (Ruturaj gaikwad) ओपनिंग (सलामीला) करण्याची संधी मिळू शकते.

दुसऱ्या वनडेत 8.2 षटकांच्या स्पेलमध्ये तब्बल 85 धावा देणाऱ्या प्रसिद्ध कृष्णावर (Prasiddh Krishna) संघाची निवड करताना विचार केला जाऊ शकतो.
प्रसिद्धच्या जागी युवा खेळाडू नितीश कुमार रेड्डीला (Nitish Kumar Reddy) अंतिम 11 मध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. नितीश कुमार रेड्डी हा फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याची क्षमता ठेवतो.

Comments are closed.