IND vs SA: लखनऊमध्ये चौथ्या टी20 सामन्यात भारत-दक्षिण आफ्रिका आमनेसामने! जाणून घ्या कोणाचे पारडं जड
आज भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना खेळवला जाणार आहे. लखनऊच्या इकाना स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येतील. सध्या भारतीय संघ मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादवचा (Suryakumar yadav) संघ आजचा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करेल, तर दक्षिण आफ्रिकेचा संघ मालिकेत टिकून राहण्यासाठी विजयाच्या इराद्याने मैदानात उतरेल.
आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये आतापर्यंत भारत आणि दक्षिण आफ्रिका 34 वेळा भिडले आहेत. त्यामध्ये भारताने 20 वेळा विजय मिळवला आहे तर, दक्षिण आफ्रिका संघाने 13 वेळा विजय मिळवला आहे. 1 सामना अनिर्णित राहिला आहे.
विशेष म्हणजे, गेल्या 9 सामन्यांपैकी भारतीय संघाने 7 वेळा विजय मिळवला आहे. आमच्या ‘प्रिडिक्शन मीटर’नुसार, या सामन्यात भारतीय संघाचे पारडं जड दिसत आहे. लखनऊच्या मैदानावर दक्षिण आफ्रिका भारताला कडवी झुंज देऊ शकते, पण भारताच्या विजयाची शक्यता जास्त आहे. हा सामना 60-40 असा रंगतदार होण्याची शक्यता आहे.
लखनऊमध्ये संध्याकाळी थंडी आणि धुक्याची शक्यता आहे, ज्यामुळे सामन्याच्या सुरुवातीलाच दव (Dew) पडू शकते. या मैदानावर अलीकडे झालेल्या टी-20 सामन्यांमध्ये फार मोठी धावसंख्या उभारली गेलेली नाही. सुरुवातीला नवीन चेंडूवर वेगवान गोलंदाजांना ‘स्विंग’ मिळतो, तर चेंडू जुना झाल्यावर फिरकीपटू (Spinners) प्रभावी ठरतात. त्यामुळे लखनऊमध्ये पुन्हा एकदा कमी धावांचा चुरशीचा सामना पाहायला मिळू शकतो.
Comments are closed.