IND vs SA: नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज शेवटचा थरार! भारत की दक्षिण आफ्रिका, कोण मारणार बाजी? पाहा हेड-टू-हेड रेकॉर्डस
भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील 5 सामन्यांची टी-20 मालिका आता अंतिम टप्प्यावर आली आहे. आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना खेळवला जाणार आहे.
भारतीय संघ मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. मालिका जिंकण्यासाठी भारताला आजचा सामना जिंकणे आवश्यक आहे. जर चौथा टी-20 सामना पावसा मुळे रद्द झाला होता, तसाच आजचा सामनाही रद्द झाला, तरी मालिका भारतीय संघाच्याच नावावर राहील.
दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेला मालिका पराभव टाळायचा असेल, तर त्यांना कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकावाच लागेल.
आमनेसामने आकडेवारी
एकूण सामने: 35
भारताचा विजय: 20
दक्षिण आफ्रिकेचा विजय: 13
अनिर्णित: 2
गेल्या 10 सामन्यांत भारताने 7 वेळा बाजी मारली आहे तर 1 सामना अनिर्णित राहिला आहे.
या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखालील भारतीय संघाचे पारडं जड दिसत आहे. दक्षिण आफ्रिकेने या मालिकेत एक सामना नक्कीच जिंकला आहे, पण अहमदाबादमध्ये भारतीय संघाचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. त्यामुळे भारताच्या विजयाची शक्यता जास्त आहे. तरीही, दोन्ही संघांमधील लढत 60-40 अशी चुरशीची असेल असे म्हणता येईल.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर सहसा हाय-स्कोअरिंग सामने होतात. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी फायदेशीर मानली जाते. हवामान पाहता सामन्यात थोड्या प्रमाणात दव पडू शकते. त्यामुळे टॉस जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. सुरुवातीच्या षटकांमध्ये नवीन चेंडूने वेगवान गोलंदाजांना स्विंग मिळू शकतो.
Comments are closed.