ICC womens world cup final: भारत–दक्षिण आफ्रिका अंतिम सामना कधी, कुठे आणि किती वाजता? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने महिला वनडे वर्ल्ड कप 2025 च्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात तब्बल 7 वेळा विजेता ठरलेल्या ऑस्ट्रेलियावर शानदार विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता फायनलमध्ये भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या उपांत्य फेरीत इंग्लंडला पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे ( icc world cup final match INDW vs SAW).
या वेळी महिला वर्ल्ड कपला नवा चॅम्पियन मिळणार आहे, कारण दोन्ही संघ पहिल्यांदाच विजेतेपद जिंकण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये तुफान झुंज पाहायला मिळणार असून हा सामना अत्यंत रोमांचक ठरणार आहे. आता पाहूया भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील महिला वर्ल्ड कप 2025 चा अंतिम सामना नेमका कधी, कुठे आणि किती वाजता होणार आहे
भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील फायनल सामना रविवार, 2 नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे. हा सामना नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगणार आहे. या मैदानावरच टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीत विक्रमी विजय मिळवला होता. सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होईल, तर दोन्ही संघांच्या कर्णधारांचा टॉस दुपारी 2.30 वाजता होईल. फायनलदरम्यान स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरलेले असेल अशी अपेक्षा आहे.
भारतीय महिला संघ तिसऱ्यांदा वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. याआधी 2005 आणि 2017 मध्ये टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली होती, मात्र दोन्ही वेळा पराभव पत्करावा लागला होता. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा हा पहिलाच वर्ल्ड कप फायनल आहे. त्यामुळे दोन्ही संघांना पहिल्यांदाच जागतिक विजेतेपद जिंकण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. दोन्ही संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून इतिहास रचण्यासाठी सज्ज आहेत.
भारत–दक्षिण आफ्रिका महिला वर्ल्ड कप 2025 चा अंतिम सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित केला जाईल. याशिवाय, चाहत्यांना हा सामना जिओ सिनेमा आणि हॉटस्टार अॅपवर मोफत लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे पाहता येणार आहे.
 
			 
											
Comments are closed.