ड्रेसिंग रुममध्ये रोहित शर्मा अन् गौतम गंभीरमध्ये झाला वाद? विराट कोहलीनेही केले दुर्लक्ष? फोटो व्हायरल

कसोटी मालिकेत लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर वन डे मालिकेतील पहिल्या लढतीत हिंदुस्थानने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. रांचीमध्ये झालेल्या लढतीत हिंदुस्थानने 17 धावांनी विजय मिळवला. या लढतीमध्ये किंग विराट कोहली याने वन डे कारकिर्दीतील 52 वे शतक झळकावले, तर रोहित शर्मा अर्धशतक ठोकले आणि सर्वाधिक षटकारांचा विक्रमही आपल्या नावे केला. या लढतीनंतर ड्रेसिंगरुममधील काही फोटो व्हायरल झाले आहेत.
सुरुवातीला रोहित शर्मा आणि टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचे ड्रेसिंग रुममधील फोटो व्हायरल झाले. या फोटोमध्ये दोघांचा चेहरा गंभीर दिसत असून ते काहीतरी चर्चा करताना दिसत आहेत. दोघांमध्ये वाद झाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली. अर्थात दोघे कोणत्या मुद्द्यावर गंभीरपणे चर्चा करत होते हे स्पष्ट झालेले नाही.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिली वनडे जिंकल्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि रोहित शर्मा एकत्र आणि बोलत होते.
त्यांच्यात काय चर्चा झाली असेल याचा कोणी अंदाज लावू शकेल??? pic.twitter.com/iyeUmNH6gM
— आशु (@AshuKharwa66211) १ डिसेंबर २०२५
दरम्यान, त्यानंतर आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला. विजयानंतर विराट कोहली ड्रेसिंग रुममध्ये परतला तेव्हा त्याने गौतम गंभीरकडे दुर्लक्ष केले असा दावा नेटकऱ्यांनी केला आहे. अर्थात हा दावा किती सत्य हे कळत नाही. कारण शतक केल्यानंतर विराट ड्रेसिंग रुममध्ये आला तेव्हा गौतम गंभीर याने त्याचे अभिनंदन करत पाठ थोपटली होती.
विराट कोहलीने विजयानंतर गौतम गंभीरकडे केले निर्दयपणे दुर्लक्ष.💀🔥
ड्रेसिंग रूममध्ये कोणत्या प्रकारचे वातावरण तयार झाले आहे याची कल्पना करा?
गौतम गंभीर, कृपया माझे आयसीटी सोडा
.तुमचे राजकारण 🧠 क्रिकेटमध्ये वापरू नका 🏏. तुम्हाला कोणीही आवडत नाही प्रत्येकाला तुम्हाला काढून टाकायचे आहे pic.twitter.com/kNvGwHiuBG— आधिवासी (@aadhivaasi0) १ डिसेंबर २०२५

Comments are closed.