हेड-टू-हेड रेकॉर्डमध्ये भारत की दक्षिण आफ्रिका कोण वरचढ? जाणून घ्या सर्वाधिक धावा आणि विकेट्स कोणाच्या नावावर!
भारत आणि दक्षिण आफ्रिका (T-20 Series IND vs SA) यांच्यातील 5 सामन्यांची टी20 मालिका मंगळवार, 9 डिसेंबरपासून सुरू होत आहे. याआधी कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेने आणि वनडे मालिका भारताने जिंकली आहे. आता टी20 मध्ये कोण बाजी मारतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
भारताची कमान सूर्यकुमार यादवकडे (Suryakumar Yadav) , तर दक्षिण आफ्रिकेच्या (प्रोटीयाज) टीमची कमान एडन मार्करम (Aiden Markram) सांभाळणार आहेत. येथे क्रिकेटच्या या छोट्या फॉरमॅटमधील दोन्ही टीम्सचे आकडेवारीनुसार हेड-टू-हेड रेकॉर्ड्स एकमेकांविरुद्धची कामगिरी दिली आहे. तसेच, सर्वात जास्त धावा आणि सर्वात जास्त विकेट्स घेणारे टॉप-5 खेळाडू कोण आहेत, हे देखील जाणून घ्या.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी20 सामना कटकच्या बाराबती स्टेडियमवर खेळला जाणार आहे. जगातील नंबर-1 टी20 फलंदाज अभिषेक शर्माकडे सर्वांचे लक्ष असेल, कारण तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये (SMAT 2025) शानदार कामगिरी करून येत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या टीमची प्रमुख रणनीती असेल की अभिषेकला लवकर आऊट करणे, कारण जर तो पॉवरप्लेमध्ये खेळत राहिला तर त्यांच्यासाठी अडचणी वाढतील.
भारतीय गोलंदाजी युनिटमध्ये वनडे सीरिजमध्ये नसलेल्या जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) वापसी होत आहे. वरुण चक्रवर्ती (Varun chakrawarthy) देखील दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांसाठी समस्या निर्माण करू शकतो.
शुबमन गिल (Shubman gill) आणि हार्दिक पांड्या (Hardik pandya) हे देखील टीममध्ये परत आले आहेत.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये आतापर्यंत एकूण 31 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत.
एकूण सामने 31
भारताने जिंकले 18
दक्षिण आफ्रिकेने जिंकले 12
अनिर्णित 1
टी20 मध्ये सर्वाधिक धावा
डेव्हिड मिलर 524
रोहित शर्मा ४२९
विराट कोहली ३९४
सूर्यकुमार यादव 372
क्विंटन डी कॉक 351
टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स
अर्शदीप सिंग १८
केशव महाराज १५
भुवनेश्वर कुमार १४
वरुण चक्रवर्ती १२
रविचंद्रन अश्विन ११
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी20 मंगळवार, 9 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजल्यापासून खेळला जाईल. सामन्याचे लाईव्ह प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होईल. लाईव्ह स्ट्रीमिंग (ऑनलाईन पाहण्यासाठी) जिओ हॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.
Comments are closed.