चौथा टी20 सामना कधी आणि कुठे मोफत पाहता येणार? मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार टीम इंडिया
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात खेळल्या जाणाऱ्या मालिकेतील चौथा टी20 सामना 17 डिसेंबर रोजी लखनऊ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यात दोन्ही संघ विजयासाठी पूर्ण प्रयत्न करतील. मालिकेत टिकून राहण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकणे आवश्यक आहे, त्यामुळे ते आपला सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करतील. चाहते हा सामना मोफत कुठे पाहू शकतात, हे जाणून घेऊया.
चाहते हा चौथा टी20 सामना स्टार स्पोर्ट्स (Star Sports) वाहिनीवर पाहू शकतात. या सामन्याचा आनंद चाहते जिओसिनेमा (JioCinema) किंवा त्यांच्या वेबसाइटवर घेऊ शकतात. हा सामना डीडी स्पोर्ट्स (DD Sports) वाहिनीवर चाहत्यांना मोफत पाहता येईल. लखनऊच्या मैदानावर चाहत्यांना मोठी धावसंख्या (runs) पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
टी20 विश्वचषकाची तयारी लक्षात घेता टीम इंडिया सध्या काहीशी चिंतेत आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि उपकर्णधार शुबमन गिल (Shubman gill) यांच्या फलंदाजी म्हणावी तेवढी प्रभावी ठरत नाही. फलंदाजी करताना हे दोन्ही खेळाडू संघर्ष करताना दिसत आहेत.
अक्षर पटेल (Axar Patel) आता दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी शहाबाज अहमदला (Shahbaz Ahmed) संघात सामील करण्यात आले आहे.
Comments are closed.