जिंका, नाही तर बॅगा भरा! हिंदुस्थान-विंडीजमध्ये आज रंगणार अस्तित्वाची लढाई
यजमान हिंदुस्थान अन् वेस्ट इंडीज या तुल्यबळ संघांमधील टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपमधील उद्या (दि. 1) होणारी सुपर-8 लढत म्हणजे ‘जिंका, नाही तर बॅगा भरा’ अशी थरारक असेल. दोन्ही संघांचे अनेक मॅच विनर फलंदाज असल्याने या लढतीत गोलंदाजांचा खऱया अर्थाने कस लागणार आहे. हिंदुस्थानची तंत्रशुद्ध फलंदाजी अन् विंडीजची अंदाधुंद फलंदाजी यात कोण वरचढ ठरणार यावर लढतीचे चित्र अवलंबून असेल. विंडीजच्या ताकदवर फलंदाजीला लगाम घालण्यासाठी टीम इंडियाला अचूक गोलंदाजी करण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल. या लढतीत जिंकणारा संघ उपांत्य फेरी गाठणार असल्याने रविवारी रात्री तमाम क्रिकेटप्रेमींच्या नजरा या तोडीस तोड लढतीकडे लागलेल्या आहेत.
हिंदुस्थान-वेस्ट इंडीज दरम्यानचा सुपर-8 फेरीतील सामना प्रत्यक्षात नॉकआऊट लढतीसारखाच बनलाय. दोन्ही संघ उपांत्य फेरीच्या उंबरठय़ावर आहेत. जो संघ हा सामना जिंकेल तो थेट उपांत्य फेरीत इंग्लंडशी भिडणार आहे. चांगल्या नेट रनरेटमुळे विंडीजचा संघ सध्या गट-1 मध्ये दुसऱया क्रमांकावर आहे. त्यामुळे हिंदुस्थानला विजयाशिवाय आता जर-तरचा दुसरा पर्याय उरलेला नाही.
शक्य युनियन
हिंदुस्थान ः अभिषेक शर्मा, ईशान किशन (यष्टिरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन/रिंकू सिंग, हार्दिक पंडय़ा, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती/कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.
वेस्ट इंडिज: ब्रेंडन किंग, शाई होप (कर्णधार आणि यष्टिरक्षक), शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, शेरफेन रदरफोर्ड, रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, जेसन होल्डर, मॅथ्यू परहाड, गुडाकेश मोती, शामर जोसेफ.
Comments are closed.