रोहित-विराट लवकरच पुन्हा मैदानावर? निवड समिती ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघात कुणाला स्थान देणार?


नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज  यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरु आहे.ही मालिका संपल्यानंतर भारताचा संघ ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात तीन वनडे आणि पाच टी 20 सामन्यांच्या मालिका खेळवल्या जाणार आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या वनडे मालिकेच्या निमित्तानं पुन्हा मैदानात पाहायला मिळू शकतात. रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं टी 20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळं दोघे आता केवळ एकदिवसीय सामने खेळताना पाहायला मिळणार आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघ निवडीसंदर्भात अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीची बैठक उद्या होणार आहे. या बैठकीत रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या संघातील समावेशाबाबत निर्णय होऊ शकतो. मात्र, संघ उद्या जाहीर होण्याची शक्यता कमी आहे.

Inida Australia Tour Schedule: भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं संपूर्ण वेळापत्रक

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात 19 ऑक्टोबरपासून होणार आहे. हा दौरा 8 नोव्हेंबरपर्यंत असेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिल्यांदा वनडे मालिका होईल. त्यानंतर टी 20 मालिका होईल.

वनडे मालिकेचं वेळापत्रक

19 ऑक्टोबर – पहिली वनडे (पर्थ)
23 ऑक्टोबर- दुसरी वनडे (एडिलेड)
25 ऑक्टोबर- तिसरी वनडे (सिडनी)

पाच सामन्यांची टी 20 मालिका

29 ऑक्टोबर – पहिली टी20 (कॅनबेरा)
31 ऑक्टोबर – दुसरी टी20 (मेलबर्न)
2 नोव्हेंबर – तिसरी टी20 (होबार्ट)
6 नोव्हेंबर – चौथी टी20 (गोल्ड कोस्ट)
8 नोव्हेंबर – पाचवी टी20 (ब्रिसबेन)

चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ पहिल्यांदा वनडे मालिका खेळणार आहे. ही मालिका थेट विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्यांच्या होम ग्राऊंडवर असेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे मालिका डिसेंबर 2020 नंतर पहिल्यांदा होणार आहे. हार्दिक पांड्या आणि रिषभ पंत दुखापतग्रस्त असल्यानं ते या मालिकेत संघात नसतील. तर, शुभमन गिलला विश्रांती दिली जाऊ शकते. संजू सॅमसनला एकदिवसीय संघात स्थान दिलं जाऊ शकतं अशा चर्चा आहेत. जसप्रीत बुमराहला देखील विश्रांती दिली जाऊ शकते. यशस्वी जयस्वाल किंवा अभिषेक शर्मा हे रोहित शर्मा सोबत सलामीला फलंदाजीला येऊ शकतात.

दरम्यान, रोहित शर्मा सध्या एकदिवसीय संघाचा भारताचा कॅप्टन आहे. तर, टी 20 मध्ये भारताचं नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे आहे. अजित आगरकरच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची बैठक उद्या म्हणजेच शनिवारी होणार आहे. या बैठकीत भारतीय क्रिकेट संघात कुणाला स्थान द्यायचं याविषयी चर्चा होईल, असा अंदाज आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.