बुमराह आलाच की टीम इंडिया हरते? आकडे सांगतात धक्कादायक सत्य!
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या जागी आकाशदीपला संघात स्थान देण्यात आले, या सामन्यात भारतीय संघाने 336 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. यापूर्वी, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पाच विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर संघात काही बदल करण्यात आले. अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला अशी आकडेवारी सांगत आहोत जी जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल, कारण जसप्रीत बुमराहशिवाय भारतीय संघाने अनेक सामने जिंकले आहेत.
क्रिकेट गणितानुसार, जेव्हा जसप्रीत बुमराह प्लेइंग ईलेव्हनचा भाग नसतो तेव्हा भारत 70% कसोटी सामने जिंकतो. याउलट, जेव्हा तो संघात असतो तेव्हा भारताला सुमारे 50% सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागतो. आकडेवारीनुसार, बुमराह प्लेइंग इलेव्हनमध्ये असताना भारताने 46 कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी 20 जिंकले आणि 22 गमावले. शिवाय चार सामने देखील अनिर्णित राहिले. बुमराह प्लेइंग इलेव्हनचा भाग नसताना, भारताने 27 सामने खेळले, त्यापैकी 19 जिंकले आणि 5 गमावले. अशा परिस्थितीत, हे आकडे स्पष्टपणे दर्शवितात की बुमराहच्या अनुपस्थितीत भारताला जास्त विजय मिळाले, तर त्याच्या उपस्थितीत पराभवांची संख्या मोठी होती.
कामाच्या ताणामुळे जसप्रीत बुमराहला दुसऱ्या कसोटी सामन्यातून विश्रांती देण्यात आली. या सामन्यात, बुमराहच्या जागी आकाशदीपला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आणि त्याने या सामन्यात त्याच्या गोलांदाजीने धुमाकूळ घातला. त्याने दोन्ही डावांमध्ये एकूण 10 विकेट्स (पहिल्या डावात 4 आणि दुसऱ्या डावात 6) घेतल्या. त्याच्या गोलंदाजीने भारताच्या विजयात मोठे योगदान दिले आहे. याशिवाय, कर्णधार शुभमन गिलने पहिल्या डावात 269 आणि दुसऱ्या डावात 161 धावा केल्या आणि इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य ठेवले, जे इंग्लंड संघ जिंकू शकला नाही आणि भारताने 336 धावांनी शानदार विजय मिळवला.
Comments are closed.