IND vs ENG; हिटमॅनचे धमाकेदार शतक, वनडे मालिका भारताच्या खिशात
(भारत विरूद्ध इंग्लंड) संघातील दुसरा वनडे सामना कटकच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघाने 4 विकेट्सने शानदार विजय मिळवला. या सामन्या हिटमॅन रोहितने जोरदार कमबॅक केला. त्याने या सामन्यात 90 चेंडूत 119 धावांची खेळी केली. दरम्यान त्याने 12 चौकारांसह खणखणीत 7 षटकार लगावले.
305 धावांचे लक्ष्य मिळालेल्या भारतीय संघासाठी कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिलने शानदार सुरूवात केली. दोन्ही खेळाडूंनी आक्रमक अंदाजात फलंदाजी करत भारतीय संघाकडे सामना झुकवला. त्यानंतर गिल 60 धावा करून बाद झाला. पण भारतीय कर्णधार रोहितने धमाकेदार शतक झळकावले. त्याने 119 धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला विराट कोहली अवघ्या 5 धावांवर तंबूत परतला. त्याला फिरकीपटू आदिल रशिदने बाद केले. त्यानंतर श्रेयस अय्यर 44, अक्षर पटेल 41, केएल राहुल 10, हार्दिक पांड्या 10, रवींद्र जडेजा 11 धावांच्या जोरावर भारतीय संघाने सहज विजय मिळवला.
इंग्लंडसाठी जेमी ओव्हरटनने सर्वाधक 2 विकेट्स घेतल्या, तर गस एटकिन्सन, आदिल रशिद आणि लियाम लिव्हिंगस्टोनने 1-1 विकेट आपल्या नावावर केली.
तत्पूर्वी या सामन्याचा टाॅस जिंकून इंग्लंड कर्णधार जोस बटलरने (Jos Buttler) फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघ 304 धावात सर्वबाद झाला. इंग्लंडसाठी जो रूटने (Joe Root) सर्वाधिक धावा केल्या. दरम्यान त्याने 72 चेंडूत 69 धावांची खेळी केली. त्यानंतर बेन डकेटने 56 चेंडूत 65 धावांची खेळी केली. लियाम लिव्हिगस्टोन 41, कर्णधार जोस बटलर 34, हॅरी ब्रुक 31, फिल साल्ट 26 धावा यांच्या जोरावर इंग्लंड संघाने 304 धावा केल्या.
भारतासाठी फिरकीपटू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) सर्वाधिक 3 विकेट्स आपल्या नावावर केल्या. त्यानतर वनडे फाॅरमॅटमध्ये पदार्पण करणाऱ्या फिरकीपटू वरूण चक्रवर्तीने 1 विकेट घेतली. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, हर्षित राणा, हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
IND vs ENG; हिटमॅनचा धमाका! भारताचा दणदणीत विजय, इंग्लंडचा धोबीपछाड
हिटमॅनचा धमाकेदार कमबॅक! शतकी खेळीने टीकाकारांची बोलती बंद!
हिटमॅनचा विक्रम! रोहितने पाँटिंगला मागे टाकत ODI क्रिकेटमध्ये रचला इतिहास
Comments are closed.