रियाध विमानतळावर स्फोट; इंडिगो, एअर इंडिया आणि अकासा एअरची उड्डाणे रद्द

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सौदी अरबची राजधानी रियाध येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्फोट झाल्याच्या वृत्तानंतर हिंदुस्थानी विमान कंपन्यांनी रियाधसाठी जाणारी उड्डाणे तात्पुरती रद्द केली आहेत. यामध्ये एअर इंडिया, अकासा एअर आणि इंडिगो या विमान कंपन्याचा समावेश आहे. मध्य पूर्वेत तणाव वाढल्याने विमान प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विमान कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे.

अकासा एअरने रियाधला जाणारी आणि तेथून येणारी उड्डाणे शनिवारपर्यंत रद्द केली आहेत. इंडिगोने आजची सर्व उड्डाणे रद्द केली आहेत, तर एअर इंडियाने दिल्लीहून रियाधला जाणारे विमान सुरक्षेच्या कारणास्तव पुन्हा दिल्लीला पाठवले. त्यानंतर हे उड्डाण रद्द करण्यात आले. एअर इंडियानेही रियाधला जाणारी आणि तेथून येणारी सर्व उड्डाणे शनिवारपर्यंत रद्द केली आहेत.

Comments are closed.