रविचंद्रन अश्विन पद्मश्री पुरस्काराने सन्मानित! राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान! VIDEO
भारतीय संघाचा माजी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला (Ravichandran Ashwin) पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी (28 एप्रिल) राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात त्याला हा पुरस्कार प्रदान केला. क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल अश्विनला हा सन्मान देण्यात आला आहे.
राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) व्यतिरिक्त, भारतीय संघाचे माजी हॉकी खेळाडू पीआर श्रीजेशला पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. बीसीसीआयने त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.
अभिनंदन @अश्विनरवी 99 भारताच्या माननीय अध्यक्षांनी प्रतिष्ठित पद्म श्री पुरस्कार प्रदान केल्यावर @rashtrapatibhvnत्याच्या उल्लेखनीय कामगिरीचा आणि एक उत्कृष्ट कारकीर्दचा सन्मान #Teamindia pic.twitter.com/8hlyqx3dsl
– बीसीसीआय (@बीसीसीआय) 28 एप्रिल, 2025
38 वर्षीय अश्विनने डिसेंबर 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. अश्विनने भारतासाठी 106 कसोटी, 116 वनडे आणि 65 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्याने 106 कसोटी सामन्यांमध्ये 537 विकेट्स घेतल्या. अनिल कुंबळे (699 विकेट्स) नंतर तो भारताकडून कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्याने 116 वनडे सामन्यांमध्ये 156 विकेट्स आणि 65 टी20 सामन्यांमध्ये 72 विकेट्स घेतल्या. अश्विनने फलंदाजीनेही आपले कौशल्य दाखवले आणि कसोटीत 6 शतके आणि 14 अर्धशतकांसह 3,503 धावा केल्या. त्याने वनडे सामन्यांमध्ये 707 धावा केल्या.
Comments are closed.