सरकारी नोकरीची मोठी संधी! 2 हजार 152 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा अराल अर्ज?
बीपीएनएल भारती 2025: सरकारी नोकरीच्या (Government job) शोधात असणाऱ्या तरुणांना मोठी संधी निर्माण झाली आहे. भारतीय पशुसंवर्धन निगम लिमिटेड (BPNL) ने 2025 साठी विविध पदांसाठी भरतीसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 2,152 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये पशुधन फार्म गुंतवणूक अधिकारी, पशुधन फार्म गुंतवणूक सहाय्यक आणि पशुधन फार्म ऑपरेशन सहाय्यक या पदांचा समावेश आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 12 मार्च 2025 पर्यंत अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.
कोणत्या पदासाठी किती जागा?
पशुधन फार्म गुंतवणूक अधिकारी – 362 पदे
पशुधन फार्म गुंतवणूक सहाय्यक – 1428 पदे
पशुधन फार्म ऑपरेशन असिस्टंट – 362 पदे
पात्रता निकष
कोणत्या पदसाठी किती पात्रता आवश्यक?
पशुधन फार्म गुंतवणूक अधिकारी: उमेदवाराला मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे अनिवार्य आहे.
पशुधन फार्म गुंतवणूक सहाय्यक: 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
पशुधन फार्म ऑपरेशन असिस्टंट: 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
किती मिळणार वेतन?
पशुधन फार्म गुंतवणूक अधिकारी: 38,200 रुपये प्रति महिना
पशुधन फार्म गुंतवणूक सहाय्यक: 30,500 रुपये प्रति महिना
पशुधन फार्म ऑपरेशन असिस्टंट: 20,000 रुपये प्रति महिना
कशी होणार निवड प्रक्रिया?
या भरतीसाठी निवड प्रक्रियेत ऑनलाइन परीक्षेचा समावेश असेल. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. यानंतर कागदपत्र पडताळणी आणि एक दिवसीय प्रशिक्षण सत्र आयोजित केले जाईल. ऑनलाइन परीक्षा एकूण 50 गुणांची असेल आणि मुलाखतही 50 गुणांची असेल. पुढील प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना दोन्ही टप्प्यात किमान 50 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.
महत्वाच्या बातम्या:
बेरोजगार तरुणांना प्रत्येक महिन्याला मिळणार 5000 रुपये, अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु, काय आहे योजना?
अधिक पाहा..
Comments are closed.