रोहित शर्माने गाठला नवा शिखर; विराट-धोनीसह कपिल देवलाही टाकलं मागे!

IND vs NZ: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये टीम इंडिया विजयाच्या रथावर आहे. भारतीय संघाने सलग तीन सामने जिंकले. यासह संघ गट ‘अ’ मध्ये अव्वल स्थान पटकावले. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात बांग्लादेशला आणि नंतर पाकिस्तानला हरवले. यानंतर, त्यांच्या तिसऱ्या सामन्यात, संघाने न्यूझीलंडला 44 धावांनी पराभूत करण्यात यश मिळवले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने श्रेयस अय्यरच्या 79 धावांच्या जोरावर 50 षटकांत 9 गडी गमावून 249 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंड संघ 45.3 षटकांत 205 धावांवर गारद झाला. केन विल्यमसन वगळता कोणीही सातत्यपूर्ण खेळू शकले नाही.

टीम इंडियाच्या या महान विजयासह, रोहित शर्माने कर्णधार म्हणून एक नवा विक्रम रचला. रोहित शर्मा आयसीसी स्पर्धांमध्ये न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवणारा भारतीय कर्णधार बनला. रोहितने कपिल देव यांना मागे टाकून मोठी कामगिरी केली. त्याच्या नेतृत्वाखाली रोहित शर्माने आयसीसी स्पर्धेत तिसऱ्यांदा न्यूझीलंड संघाला पराभूत केले. या सामन्यापूर्वी, रोहितने कर्णधार म्हणून आयसीसी विश्वचषक 2023 च्या गट टप्प्यात न्यूझीलंडला 4 गडी राखून पराभूत केले. त्याच स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात, रोहितच्या नेतृत्वाखाली, भारतीय संघाने न्यूझीलंडला 70 धावांनी पराभूत करण्यात यश मिळवले आणि आता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये, रोहितने किवी संघावर आणखी एक शानदार विजय नोंदवला आहे.

आयसीसी स्पर्धांमध्ये न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवणारा भारतीय कर्णधार

3 वेळा – रोहित शर्मा*
2 वेळा – कपिल देव
1 वेळ – सौरव गांगुली

सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2003 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या सुपर सिक्समध्ये न्यूझीलंडला पराभूत करण्यात यश मिळवले होते. तर कपिल देव यांनी 1987 मध्ये खेळल्या गेलेल्या विश्वचषकात न्यूझीलंडला दोनदा पराभूत केले होते. पहिल्या सामन्यात कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 16 धावांनी विजय मिळवला, तर दुसऱ्या सामन्यात संघाने न्यूझीलंडचा 9 गडी राखून पराभव केला.

हेही वाचा-

थोडक्यात हुकला ऐतिहासिक वर्ल्ड रेकॉर्ड, न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाच्या हातून संधी निसटली!
पाकिस्तानची नाचक्की! सेमीफायनलपूर्वीच गद्दाफी स्टेडियमच्या छताला गळती, PCBची मोठी फजिती

Comments are closed.