क्रिकेट चाहत्यांसाठी जॅकपॉट! 2026 मध्ये टीम इंडिया खेळणार वर्ल्ड कपसह 15+ मालिका, पाहा संपूर्ण वर्षाचे वेळापत्रक
2025 हे वर्ष इतिहासजमा झाले असले, तरी भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी 2026 हे वर्ष प्रचंड उत्साह घेऊन येत आहे. मागील वर्षी भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकत दमदार कामगिरी केली, मात्र विराट कोहली आणि रोहित शर्मा यांसारख्या दिग्गजांनी कसोटी क्रिकेटला दिलेल्या निरोपामुळे चाहत्यांच्या डोळ्यांत पाणी आले. आता हीच टीम इंडिया नव्या जोमाने, नव्या आव्हानांसह 2026 मध्ये मैदानात उतरण्यास सज्ज झाली आहे.
नवीन वर्षाची सुरुवातच भारत–न्यूझीलंड मालिकेने होणार आहे. 11 जानेवारी 2026 पासून तीन वनडे आणि पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.
वनडे मालिका वेळापत्रक :
11 जानेवारी : पहिला वनडे – वडोदरा
14 जानेवारी : दुसरा वनडे – राजकोट
18 जानेवारी : तिसरा वनडे – इंदौर
टी20 मालिका वेळापत्रक :
21 जानेवारी : पहिला टी-20 – नागपूर
23 जानेवारी : दुसरा टी-20 – रायपूर
25 जानेवारी : तिसरा टी-20 – गुवाहाटी
28 जानेवारी : चौथा टी-20 – विशाखापट्टणम
31 जानेवारी : पाचवा टी-20 – तिरुवनंतपुरम
T20 विश्वचषक 2026
फेब्रुवारी–मार्च 2026 मध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया मोठ्या अपेक्षांसह उतरणार आहे. स्पर्धा 7 फेब्रुवारीपासून सुरू होऊन 8 मार्चला अंतिम सामना खेळवला जाईल.
टीम इंडियाचे ग्रुप स्टेज सामने :
7 फेब्रुवारी : भारत वि. यूएसए– मुंबई
१२ फेब्रुवारी: भारत विरुद्ध नामिबिया – दिल्ली
15 फेब्रुवारी : भारत वि. पाकिस्तान – कोलंबो
18 फेब्रुवारी : भारत वि. नेदरलँड – अहमदाबाद
सुपर-8 आणि नॉकआउट सामने 21 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान होतील.
जून 2026 : अफगाणिस्तान भारत दौरा – 3 वनडे + 1 कसोटी सामना
जुलै 2026 : भारताचा इंग्लंड दौरा – 5 टी20 + 3 वनडे सामने
टी20 मालिका
1 जुलै: डरहम
4 जुलै : मॅनचेस्टर
७ जुलै : नॉटिंगहॅम
९ जुलै: ब्रिस्टल
11 जुलै : साउथॅम्प्टन
वनडे मालिका:
14 जुलै : बर्मिंगहॅम
16 जुलै : कार्डिफ
19 जुलै : लॉर्ड्स, लंडन
ऑगस्ट 2026 : भारताचा श्रीलंका दौरा – 2 कसोटी समोर
सप्टेंबर 2026 : अफगाणिस्तानविरुद्ध न्यूट्रल वेन्यूवर 3 टी20 सामने
सप्टेंबर–ऑक्टोबर 2026 : वेस्ट इंडीज भारत दौरा – 3 वनडे+ 5 टी20 सामने
ऑक्टोबर–नोव्हेंबर 2026 : भारताचा न्यूझीलंड दौरा – 2 कसोटी + 3 वनडे+ 5 टी20 सामने
डिसेंबर 2026 : श्रीलंका भारत दौरा – 3 वनडे+ 3 टी20 सामने
Comments are closed.