टीम इंडियाच्या 'या' खेळाडूने घेतली निवृत्ती, चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी संघाला मोठा धक्का!

भारतीय क्रिकेट संघाचा विकेटकिपर रिद्धिमान साहा सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. तो बराच काळ टीम इंडियाबाहेर होता. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तोंडावर त्याने ही घोषणा केली. साहा सतत्याने देशांतर्गत क्रिकेटच्या सामन्यांमध्ये खेळत होता. तो रणजी ट्रॉफीमध्ये बंगालकडून खेळत होता. आज (01 फेब्रुवारी) शनिवारी संध्याकाळी साहाने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत निवृत्तीची घोषणा केली. ज्यात त्याने सर्वांचे आभार मानले.

रिद्धिमान साहाने टीम इंडियासाठी शेवटचा कसोटी सामना डिसेंबर 2021 मध्ये खेळला होता. तर शेवटचा एकदिवसीय सामना नोव्हेंबर 2014 मध्ये खेळला होता. साहा बराच काळ टीम इंडियाबाहेर राहिला. या दरम्यान तो देशांतर्गत सामने खेळत राहिला. त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक पोस्ट शेअर करताना साहाने लिहिले की, “एक सुंदर प्रवास संपला आहे. मी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. 1997 मध्ये मी पहिल्यांदा क्रिकेटच्या मैदानावर पाऊल ठेवल्यापासून 28 वर्षे उलटून गेली आहेत. हा प्रवास किती सुंदर होता. देश, राज्य, जिल्हा, क्लब, विद्यापीठ आणि महाविद्यालय यासाठी खेळणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.”

साहाच्या आंतरराष्ट्रीय करिअरबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने भारतासाठी 40 कसोटी सामने खेळल्या आहेत. या दरम्यान त्याने 1353 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याने 3 शतके आणि 6 अर्धशतके झळकावली. तर त्याने भारतासाठी 9 एकदिवसीय सामने खेळली आहेत. त्या दरम्यान त्याची कामगिरी फारशी खास नव्हती.

साहाची स्थानिक कारकीर्द चमकदार राहिली आहे. त्याने 142 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 7169 धावा केल्या आहेत. त्याने या फॉरमॅटमध्ये 14 शतके आणि 44 अर्धशतके झळकावली आहेत. साहाने 116 लिस्ट ए सामन्यांमध्ये 3072 धावा केल्या आहेत. या दरमयान त्याने 3 शतके आणि 20 अर्धशतके झळकावली आहेत. साहाने 225 टी 20 सामनेही खेळल्या आहेत. ज्यात त्याने या 4655 धावा केल्या आहेत.

हेही वाचा-

हर्षित राणाला खेळवल्यामुळे इंग्लंड खेळाडूंनी उठवले प्रश्न, भारताच्या प्रशिक्षकाचे रोखठोक उत्तर
आयपीएलमध्ये अनसोल्ड ठरलेल्या स्टार खेळाडूची SA20 मध्ये धमाकेदार कामगिरी!
विराट कोहलीने चाहत्यांची मने जिंकली, ग्राउंड स्टाफ आणि पोलिसांना दिला विशेष सन्मान!

Comments are closed.