‘झेनोफोबिक’ व्यवस्थेमुळे हिंदुस्थानी उद्योजकावर कंपनी विकून मायदेशी परतण्याची वेळ; सोशल मीडियावर संताप

स्वीडनमध्ये स्वतःची कंपनी स्थापन करणाऱ्या एका हिंदुस्थानी उद्योजकाला तेथील जाचक आणि प्रतिकूल इमिग्रेशन प्रक्रियेमुळे आपला व्यवसाय विकून हिंदुस्थानात परतावे लागत आहे. हायड्रो स्पेस स्वीडन एबी (Hydro Space Sweden AB) या कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अभिजीत नाग बालसुब्रमण्य यांनी सोशल मीडियावर आपली कैफियत मांडल्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. स्वीडनची व्यवस्था ‘झेनोफोबिक’ (परकीयांचा द्वेष करणारी) आणि अकार्यक्षम असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

अभिजीत बालसुब्रमण्य यांनी सांगितले की, त्यांच्या कंपनीने उत्पादित केलेल्या उत्पादनांचे स्थानिक पातळीवर कौतुक होत होते, मात्र स्वीडिश मायग्रेशन एजन्सीने (Migrationsverket) त्यांना मुक्तपणे व्यवसाय करू दिला नाही. ‘आज मी अधिकृतपणे हायड्रो स्पेस स्वीडन एबीच्या संस्थापक आणि सीईओ पदाचा राजीनामा देत आहे. मला या महिन्याच्या अखेरीस देश सोडण्यास भाग पाडले जात असल्याने मी माझी कंपनी विकली आहे’, असे त्यांनी लिंकडइन पोस्टमध्ये म्हटले आहे. हा निर्णय स्वतःच्या इच्छेने घेतलेला नसून, एका अकार्यक्षम आणि प्रतिकूल सरकारी यंत्रणेने केलेली ही एक प्रकारे हकालपट्टीच असल्याचे त्यांनी नमूद केले. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.

स्वीडन स्वतःला स्टार्टअपसाठी पोषक देश असल्याचे मिरवते, मात्र हा केवळ एक देखावा असल्याचे अभिजीत यांनी म्हटले आहे. मायग्रेशन एजन्सीच्या ढिसाळ कारभारामुळे आणि पद्धतशीर शत्रुत्वामुळे परदेशी उद्योजकांना तिथे टिकणे कठीण झाले आहे. या व्यवस्थेशी कायदेशीर लढाई लढण्याची आता आपली इच्छा नसल्याचे सांगत त्यांनी मानसिक स्वास्थ्यासाठी हिंदु्स्थानात परतण्याचा निर्णय घेतला आहे.

Xenophobic म्हणजे काय?

Xenophobic (झेनोफोबिक) या शब्दाचा सोपा अर्थ ‘परकीय लोकांविषयी वाटणारी भीती किंवा द्वेष’ असा होतो.

जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या स्वतःच्या देशातील किंवा संस्कृतीतील नसलेल्या लोकांशी (उदा. परदेशी नागरिक, इतर धर्माचे किंवा वंशाचे लोक) भेदभाव करते किंवा त्यांचा तिरस्कार करते, तेव्हा त्याला ‘Xenophobic’ म्हटले जाते.

Xenophobic हा शब्द मूळ ग्रीक शब्द ‘Xenos’ (परका/अनोळखी) आणि ‘Phobos’ (भीती) यांपासून तयार झाला आहे.

यात समोरच्या व्यक्तीला न ओळखता, केवळ ती ‘बाहेरची’ आहे या कारणावरून तिच्याबद्दल मनात वाईट मत बनवले जाते.

अशा मानसिकतेतून अनेकदा परकीयांना तुच्छ लेखणे, त्यांना नोकरी किंवा राहण्यास नकार देणे किंवा त्यांच्यावर टीका करणे असे प्रकार घडतात.

अधिकाऱ्यांच्या अज्ञानाचा फटका

अभिजीत यांच्याकडे इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगची पदवी आणि आंतरराष्ट्रीय मार्केटिंग व शाश्वत शेती विषयातील दोन मास्टर पदव्या आहेत. तरीही, त्यांच्या फाईलवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना व्यवसायाची किमान समज नव्हती, असा आरोप त्यांनी केला. वारंवार विनंती करूनही कागदपत्रांबाबत कोणतेही मार्गदर्शन मिळाले नाही आणि अर्जाच्या नाकारण्याची कारणे वारंवार बदलली गेली, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सोशल मीडियावर समर्थनाचा ओघ

ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटिझन्सनी अभिजीत यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे. अनेकांनी स्वीडनमधील इमिग्रेशन कार्यालयाचा अनुभव हा ‘दमनकारी संस्थे’सारखा असल्याचे म्हटले आहे. एका युजरने कमेंट केली की, ‘एका उद्योजकासोबत अशा प्रकारचे वागणे निंदनीय आहे, जो स्वीडनमध्ये संपत्ती, रोजगार आणि कर महसूल निर्माण करत होता’.

भारतीय उद्योजक अभिजित बालसुब्रमण्य यांनी झेनोफोबिक इमिग्रेशन सिस्टममुळे स्वीडनची विकलेली कंपनी सोडली सामना बातम्या

भारतीय उद्योजक अभिजित नाग बालसुब्रमण्य यांना स्वीडन सोडण्यास भाग पाडले आणि प्रतिकूल इमिग्रेशन धोरणे आणि झेनोफोबिक प्रणालीमुळे त्यांची कंपनी हायड्रो स्पेस विकली. Saamana.com वर अधिक वाचा.

सामना, सामना, सामना, दैनिक सामना, सामना.

Comments are closed.