न्यूयॉर्कमध्ये हिंदुस्थानी विद्यार्थिनीचा अपघातात मृत्यू
मंदिराच्या दिशेने जात असताना पाठीमागून येणाऱ्या गाडीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका हिंदुस्थानी विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. प्रसन्ना अतलुरी असे विद्यार्थिनीचे नाव असून ती मूळची आंध्र प्रदेशची रहिवासी होती.
अमेरिकेतील पेस युनिव्हर्सिटीच्या लुबिन स्कूल ऑफ बिझनेसमध्ये ती शिक्षण घेत होती. मुलीच्या मृत्यूची बातमी समजताच तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. प्रसन्नाचा मृतदेह मायदेशी आणला जाणार आहे.
Comments are closed.