क्रिडाविश्वावर शोककळा, मैदानावरच छातीत दुखू लागल्याने फुटबॉलपटूचा झाला मृत्यू

भारतीय फुटबॉलपटू रविंदर सिंग याचे अचानक निधन झाले, ज्यामुळे भारतीय फुटबॉल विश्व हादरून गेले. रविंदर सिंग पंजाबमधील नवांशहर जिल्ह्यातील बछौरामध्ये एका स्पर्धेत खेळत होता. सामन्यादरम्यान अचानक त्याच्या छातीत दुखू लागले आणि तो कोसळला. मैदानावर उपस्थित असलेल्यांनी लगेचच हालचाल करत त्याला तातडीने एका खाजगी रुग्णालयात नेले, मात्र तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. सुरूवातीच्या अहवालात रविंदरच्या मृत्यूचे कारण हृद्यविकाराचा झटका आल्याने झाला असे सांगितले जात आहे.
रिपोर्ट्सनुसार, रविंदरचे अंतिम संस्कार त्याच्या गावी झाले. तेथे त्याचे कुटुंब, मित्र आणि सहकारी फुटबॉलपटू उपस्थित होते.
कोण होता रविंदर सिंग?
पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील माजरीचा रहवासी असलेला रविंदरचा इंडियन फुटबॉल लीग (भारतीय व्यवसायिक फुटबॉलचा लेवल -२) मधील नामधारी एफसीसोबत करारबद्ध होता. केवळ २५ वर्षाच्या या डिफेंडर मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे. तो नामधारी एफसीच्या लाइनअपमधील प्रमुख खेळाडू होता.
क्लबकडून श्रद्धांजली
डिफेंडर रविंदरबाबत अनेक फुटबॉल संघांनी सोशल मीडियामार्फत त्यांचे दु:ख व्यक्त केले आहे. नामधारी क्लबने एक व्हिडियोही शेयर केला आहे. भारतीय फुटबॉलने पोस्ट शेयर केली असून त्यामध्ये लिहिले, “आमचा फुटबॉलपटू रविंदर सिंग इतक्या लहान वयात त्याचे निधन झाल्याचे जाहीर करताना दु:ख होत आहे. त्याचे अकाली जाणे हे फुटबॉल जगताचे मोठे नुकसान आहे. त्याच्या आत्म्यास शांती लाभो आणि कठीण काळात देव त्याच्या कुटुंबाला शक्ती आणि धैर्य देवो.”
रविदंर फुटबॉलबरोबर शिक्षणही घेत होता. तो गडशंकरच्या बब्बर मेमोरियल खालसा कॉलेजमध्ये बीएच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी होता.
या घटनेनंतर इंडियन फुटबॉल लीगने (IFL) पुढील फेरीतील सर्व सामन्यांपूर्वी रविंदरसाठी एक मिनिट मौन पाळण्याची घोषणा केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले, “मॅचवीक ३ च्या प्रत्येक सामन्यापूर्वी त्यांच्या स्मृतीचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंब, मित्र आणि नामधारी एफसी यांच्यासोबत एकता दर्शविण्यासाठी एक मिनिट मौन पाळले जाईल.”
रविंदरच्या निधनावर बेंगलोर एफसी, मिनर्व्हा एफसी आणि गोकुलम केरळ यांनीही दु:ख व्यक्त केले आहे.
Comments are closed.