इंडियन आयडल 12 विजेता पवनदीप राजनच्या कारला भीषण अपघात, रुग्णालयात उपचार सुरू

इंडियन आयडल सीझन 12 चा विजेता आणि गायक पवनदीप राजन याच्या कारला भीषण अपघात झाला. अहमदाबाद येथे सोमवारी पहाटे 3.40 वाजता ही घटना घडली. या अपघातात पवनदीप गंभीर जखमी झाला आहे. पवनदीप सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पवनदीपचा रुग्णालयातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत पवनदीपच्या डाव्या पायाला आणि उजव्या हाताला जखमा दिसत आहेत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पवनदीपच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर चिंता व्यक्त करत, तो लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

पवनदीपच्या कारचा अपघात नेमका कसा झाला? आणि त्याला किती दुखापत झाली याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळू शकली नाही. अपघातात कारचा चक्काचूर झाला. नुकताच 27 एप्रिल रोजी पवनदीपने आपला वाढदिवस साजरा केला.

Comments are closed.