पुरुषांनी हॉकीत मैदान मारत जिंकले गोल्ड; फायनलमध्ये मलेशियाचा धुव्वा
पुरुषांनीही हॉकीमध्ये सुवर्णपरंपरा कायम ठेवत शनिवारी सोनेरी कामगिरी केली. हॉकीच्या अंतिम फेरीत पुरुषांनी मलेशियाचा 5-1 असा फडशा पाडला आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली.
सामन्याच्या 11 व्या मिनिटाला हरमनप्रीतने हिंदुस्थानच्या गोलचे खाते उघडले. पण त्यानंतर फक्त तिसऱयाच मिनिटाला मलेशियाने गोल करत सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली. त्यामुळे पहिल्या सत्रात दोन्ही संघ बरोबरीत होते. पण दुसऱया सत्रात मात्र जुगराने संघाला आघाडी मिळवून दिली. 42 व्या मिनिटाला गोल करत हिंदुस्थानला 3-1 असे आघाडीवर आणले. चौथ्या सत्रात शिलानंदने 54 व्या आणि पुन्हा हरमनप्रीतने 57 व्या मिनिटाला गोल करत संघाचा विजय 5-1 असा सुकर केला.
Comments are closed.