तिसऱ्या कटककर करंडक अखिल भारतीय आंतर क्लब वॉटर पोलो स्पर्धेत इंडियन नेव्ही, सेंट्रल रेल्वे संघांचा दुसरा विजय

पुणे, (18 फेब्रुवारी) 2026 रोजी ऑलिम्पिक स्पोर्टस असलेल्या वाॅटरपोलोला प्रोत्साहन देण्यासाठी डेक्कन जिमखान्या यांच्या तर्फे आयोजित तिसऱ्या कटककर करंडक अखिल भारतीय आंतर क्लब वॉटर पोलो स्पर्धेत साखळी फेरीत सेंट्रल रेल्वे(मध्य रेल्वे), इंडियन नेव्ही(भारतीय नौदल) या संघांनी आपली विजयी मालिका कायम ठेवत दुसऱ्या विजयाची नोंद केली.

डेक्कन जिमखान्याच्या टिळक तलावावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत सेंट्रल रेल्वे(मध्य रेल्वे) संघाने डेक्कन जिमखाना संघाचा 23-7 असा पराभव करून विजयी सलामी दिली. विजयी संघाकडून अमल कुमार 6, अप्पू एनएस 5, उदय उत्तेकर 4, ऋतुराज बीडकर 3, रोहित बीएस 2, पार्थ अंबुलकर 2, रोहित कुटे 1 यांनी सुरेख खेळी केली. तर, भागेश कुटे 4, अंकित प्रसाद 3, वैभव कुटे 3, प्रणव म्हात्रे 2 यांच्या विजयी खेळीच्या जोरावर इंडियन नेव्ही(भारतीय नौदल) संघाने रिलायन्स रायगड संघाचा 16-5 असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात इंडियन नेव्ही(भारतीय नौदल) संघाने त्रिवेंद्रम इलेव्हन संघाचा 9-6 असा पराभव करून दुसरा विजय मिळवला.

अन्य चुरशीच्या लढतीत डेक्कन जिमखाना संघाने इंडियन एअरफोर्स(भारतीय वायुसेना) संघाचा पेनल्टी शूट आउटमध्ये 13-12 असा संघर्षपूर्ण पराभव केला. निर्धारित वेळेत 9-9 असा सामना बरोबरीत सुटल्याने पेनल्टी शूट आऊटचा अवलंब करण्यात आला. पेनल्टी शूटमध्ये डेक्कन जिमखाना संघाने इंडियन एअरफोर्स(भारतीय वायुसेना) संघाचा 4-3 असा पराभव केला.

स्पर्धेचे उद्घाटन कॅट कंट्रोलचे हेमंत कटककर, डेक्कन जिमखानाचे मानद सचिव मिहिर केळकर आणि विश्वेश कटककर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डेक्कन जिमखानाचे चीफ ट्रस्टी जय आपटे, स्पर्धा संचालक शौर्य करंदीकर, नीता तळवळीकर, माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू संजय करंदीकर, शैलेश ताम्हणकर, चंदू दाते, कुणाल वणकुद्रे, आशिष सांडू, मयंक पटेल, संकेत शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

निकाल: साखळी फेरी:
सेंट्रल रेल्वे(मध्य रेल्वे): 23(अमल कुमार 6, अप्पू एनएस 5, उदय उत्तेकर 4, ऋतुराज बीडकर 3, रोहित बीएस 2, पार्थ अंबुलकर 2, रोहित कुटे 1)वि.वि.डेक्कन जिमखाना: 7 (पीयूष सूर्यवंशी 3, प्रयाग जैस्वाल 2, वैष्णव महाडिक 1, बाळासाहेब भिसे 1);सामनावीर-अमल कुमार;

साऊथ रेल्वे(दक्षिण रेल्वे): 13(आदर्श बीएस 5, अभिलाष आर 2, अंबाडी एनएस 2, आदित्यन एबी 2, आनंदू ए 1, आकाश व्हीएस 1)वि.वि.इंडियन एअरफोर्स(भारतीय वायुसेना): 5(लाल कृष्ण 1, नितेश यूएन 1, मोंजित एमएम 1, प्रवीण 1, अखिल बीके 1); सामनावीर – आदर्श बीएस;

इंडियन नेव्ही(भारतीय नौदल): 16(भागेश कुटे 4, अंकित प्रसाद 3, वैभव कुटे 3, प्रणव म्हात्रे 2, सुमित शॉ 1, अभिषेक गुप्ता 1, संदीप डीएस 1, सुमित प्रसाद 1) वि.वि.रिलायन्स रायगड: 5(दिनांशू कुटे 1, श्रवण इंद्रे 1, हर्ष ठाकूर 1, निखिल शिंदे 1, साहिल कुटे 1); सामनावीर – अंकित प्रसाद;

वेस्टर्न रेल्वे(पश्चिम रेल्वे): 16 (श्रेयस वैद्य 5, अश्विनीकुमार कुंडे 4, सारंग वैद्य 3, आदित्य थिटे 2, मनीष खोमणे 2)वि.वि.त्रिवेंद्रम इलेव्हन: 2 (आनंद सतीश 1, विसाळ व्ही 1); सामनावीर -श्रेयस वैद्य;

सेंट्रल रेल्वे(मध्य रेल्वे): 16(रोहित बीएस 3, उदय उत्तेकर 3, अफसल नवस 2, ऋतुराज बीडकर 2, अमल कुमार 2, रोहित कुटे 2, अप्पू एनएस 1, महेश कुटे 1)वि.वि.अमरावती: 2(आर्यन हिंगिमरे 1,अश्विन कलोटी 1); सामनावीर – अश्विन कलोटी;

Comments are closed.