तिसऱ्या कटककर करंडक अखिल भारतीय आंतर क्लब वॉटर पोलो स्पर्धेत इंडियन नेव्ही व वेस्टर्न रेल्वे यांच्यात अंतिम लढत

ऑलिंपिक स्पोर्टस असलेल्या वाॅटरपोलोला प्रोत्साहन देण्यासाठी डेक्कन जिमखान्या यांच्या तर्फे आयोजित तिसऱ्या कटककर करंडक अखिल भारतीय आंतर क्लब वॉटर पोलो स्पर्धेत उपांत्य फेरीत इंडियन नेव्ही(भारतीय नौदल), वेस्टर्न रेल्वे (पश्चिम रेल्वे) या संघांनी अनुक्रमे सेंट्रल रेल्वे(मध्य रेल्वे) व साऊथ रेल्वे(दक्षिण रेल्वे) या संघांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

डेक्कन जिमखान्याच्या टिळक तलावावर सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात इंडियन नेव्ही(भारतीय नौदल) संघाने सेंट्रल रेल्वे(मध्य रेल्वे) संघाचा 12-9 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. विजयी संघाकडून आनंद एमएस 4, अंकित प्रसाद 4, वैभव कुटे 3, संदीप डीएस 1 यांनी सुरेख खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. पराभुत संघाकडून अमल कुमार 4, रोहित बीएस 3, उदय उत्तेकर 1, निमिश निजामपूरकर 1 यांनी दिलेली लढत अपुरी ठरली.

दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत आदित्य थेटे 3, अक्षयकुमार कुंडे 2, सारंग वैद्य 1, करण शुक्ला 1 यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर वेस्टर्न रेल्वे(पश्चिम रेल्वे) संघाने साऊथ रेल्वे(दक्षिण रेल्वे)संघाचा 7-4 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.

स्पर्धेचा अंतिम सामना आज 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.3वाजता होणार आहे.

निकाल: उपांत्य फेरी:
इंडियन नेव्ही(भारतीय नौदल): 12(आनंद एमएस 4, अंकित प्रसाद 4, वैभव कुटे 3, संदीप डीएस 1) वि.वि. सेंट्रल रेल्वे(मध्य रेल्वे): 9(अमल कुमार 4, रोहित बीएस 3, उदय उत्तेकर 1, निमिश निजामपूरकर 1); सामनावीर – आनंद एमएस;

वेस्टर्न रेल्वे(पश्चिम रेल्वे): 7(आदित्य थेटे 3, अक्षयकुमार कुंडे 2, सारंग वैद्य 1, करण शुक्ला 1) वि.वि.साऊथ रेल्वे(दक्षिण रेल्वे): 4(आकाश व्हीएस 2, अभिलाष आर 1, अंबाडी एनएस 1); सामनावीर – आकाश व्हीएस.

Comments are closed.