हिंदुस्थानी दाम्पत्याने अमेरिकन विद्यापीठाला केले 191 कोटी दान
हिंदुस्थानी वंशाच्या एका जोडप्याने अमेरिकेतील उत्तर टेक्सास विद्यापीठाला दोन कोटी डॉलर म्हणजे सुमारे 191 कोटी रुपये एवढी रक्कम दान केली आहे. या रकमेतून एआय आणि अॅडव्हान्स अॅनालिटिक्स महाविद्यालय स्थापन केले जाणार आहे. विकास आणि अनुराधा सिन्हा असे या दाम्पत्याचे नाव आहे.
देणगीतून सहा स्थायी निधी उभारण्यात येणार आहेत. शिष्यवृत्ती, संशोधन, प्राध्यापकांची भरती तसेच उद्यमशीलता विकास आदींसाठी हा निधी वापरला जाणार आहे.
Comments are closed.