हिंदुस्थानी वंशाच्या खेळाडूची व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती; 38 व्या वर्षी घेतला मोठा निर्णय

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानी वंशाचा खेळाडू ज्याने न्यूझीलंडकडून खेळण्याचं स्वप्न पाहिलं होतं. पाहिलेलं स्वप्न त्याने सत्यात उतरवलं आणि 2016 साली पाकिस्तानविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने दमदार कामगिरी केली. मात्र, वयाच्या 38 व्या वर्षी जीत रावलने व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. मुळचा गुजरातचा असलेला जीत रावल तरुण वयातच आपल्या कुटुंबासह न्यूझीलंडमध्ये स्थलांतरीत झाला होता.

जीत रावलचा जन्म गुजरातमध्ये झाला होता. विशेष म्हणजे हिंदुस्थानचा माजी यष्टीरक्षक-फलंदाज पार्थिव पटेल आणि जीत रावल एकाच शाळेमध्ये होते. कालांतराने जीत रावलचे कुटुंब न्यूझीलंडमध्ये स्थलांतरीत झालं. न्यूझीलंडसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचे त्याचे व त्यांच्या वडिलांचे स्वप्न होते, जे त्याने प्रत्यक्षात आणले. नोव्हेंबर 2016 मध्ये पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण करणाऱ्या रावलने आपल्या पहिल्याच कसोटीच्या पहिल्या डावात 55 आणि दुसऱ्या डावात नाबाद 36 धावांची खेळी केली होती. त्याने न्यूझीलंडसाठी 24 कसोटी सामन्यांच्या 39 डावांत 1 शतक आणि 5 अर्धशतकांसह एकूण 1143 धावा केल्या. जानेवारी 2020 मध्ये ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध सिडनी येथे त्याने आपला शेवटचा कसोटी सामना खेळला होता.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट व्यतिरिक्त, जीत रावल हा फर्स्ट-क्लास क्रिकेटचा एक दिग्गज खेळाडू राहिला आहे. आपल्या तब्बल 164 सामन्यांच्या कारकिर्दीत त्यांने 24 शतके आणि 50 अर्धशतकांसह एकूण 10,432 धावांचा पल्ला गाठला. फर्स्ट-क्लास क्रिकेटमध्ये त्याची फलंदाजीची सरासरी 47.91 इतकी दमदार राहिली आहे.

Comments are closed.