कॅलिफोर्नियात हिंदुस्थानी वंशाच्या महिलेची हत्या
कॅलिफोर्नियातील सॅक्रामेंटो येथे हिंदुस्थानी वंशाच्या महिलेची भररस्त्यात गोळी घालून हत्या करण्यात आली. शालिनी ठाकूर असे या महिलेचे नाव असून ती 38 वर्षाची होती. गेल्या काही महिन्यांपासून एक 22 वर्षीय तरुण तिचे लैंगिक शोषण आणि मानसिक छळ करत होता.
पीडित शालिनी ठाकूर हिला सॅक्रामेंटोच्या आर्डेन आर्केड परिसरातील एका शॉपिंग प्लाझामध्ये जात असताना आरोपीने तिला अडवले. शालिनीने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु रोहितने तिचा पाठलाग करत भररस्त्यात तिच्यावर लागोपाठ गोळ्या झाडल्या. ती खाली पडल्यानंतर त्याने अगदी जवळून तिच्या डोक्यात आणखी एक गोळी झाडली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा पाठलाग केल्यानंतर आरोपीने स्वतःवर गोळी झाडली. यात त्याचा मृत्यू झाला.
Comments are closed.