Indian Pickleball League – हिंदुस्थानचा नंबर 1 खेळाडू लखनौच्या ताफ्यात; व्हिएतनामच्या डुओंगसाठी मुंबई, तर अमेरिकेच्या फजसाठी हैदराबादनं लावली बोली
इंडियन पिकलबॉल लीगच्या पहिल्या हंगामासाठीचा लिलाव शनिवारी मुंबईत पार पडला. 1 ते 7 डिसेंबर दरम्यान नवी दिल्लीत ही स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेत मुंबई स्मॅशर्स, हैदराबाद रॉयल्स, चेन्नई सुपर वॉरियर्स, कॅपिटल वॉरियर्स गुडगाव, बंगळुरु ब्लास्टर्स आणि लखनौ लेपर्डस हे सहा संघ सहभागी होणार आहेत.
लिलावामध्ये चांगले खेळाडू आपल्या ताफ्यात घेण्यासाठी सहाही संघांमध्ये रस्सीखेंच सुरू होती. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या व्हिएतनामच्या क्वांग डुओग याला मुंबई स्मॅशर्सने, तर अणेरिकेची मेगन फज ही या महिला खेळाडूला हैदराबाद रॉयल्सने सर्वाधिक बोली लावून आपल्याकडे खेचले. हिंदुस्थानच्या अव्वल पुरूष खेळाडू आदित्य रुहेला याच्यावर लखनौने सर्वाधिक बोली लावली. ‘प्लेअर्स ड्राफ्ट’मध्ये एकूण 53 खेळाडूंचा समावेश होता, त्यापैकी तीन स्पर्धात्मक गटांमधून 36 अव्वल नावांची निवड करण्यात आली.
सहाही संघातील प्रमुख खेळाडू
मुंबई स्मॅशर्स – क्वांग डुओंग, एलिसन हॅरिस, अनमोल रामचंदानी, पर्ल अमलसदीवाला
लखनौ बिबट्या – आदित्य रुहेला, रेलर डेहार्ट, शेल्बी बेट्स, मिहिका यादव
हैदराबाद रॉयल्स – बेन नेवेल, मेगन फज, दिव्यांशु कटारिया, स्नेहल पाटील
चेन्नई सुपर वॉरियर्स – मिशेल हरग्रीव्स, रुस व्हॅन रिक, हर्ष मेहता, आलिया इब्राहिम
कॅपिटल वॉरियर्स गुडगांव – जॅक मनरो, एमिलिया श्मिट, स्तव्या भसीन, नायमी मेहता
बेंगळुरू ब्लास्टर्स – फुक ह्युन्ह, पेई चुआन काओ, अर्जुन सिंग, रक्षीखा रवी
Comments are closed.