करोडोंची घड्याळं आणि गाड्यांप्रमाणेच, भारतीय खेळाडू कपड्यांवरही लाखों उडवतो! दिग्गज खेळाडूचा खुलासा

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या त्याच्या खेळातील प्रदर्शनाबद्दल नेहमीच चर्चेत असतो पण मैदानाच्या बाहेर सुद्धा त्याच्या चर्चा सुरू असतात. आताच मागे हार्दिक पांड्या मैदानात करोडो रुपयांचे घड्याळ घालून खेळत होता, त्यामुळे तो खूप वायरल झाला होता. तसेच हार्दिकच्या कार कलेक्शनमध्ये सुद्धा महागड्या गाड्या पाहायला मिळतात. तसेच याव्यतिरिक्तही त्याच्या अजून काय काय आवडीनिवडी आहेत? अंबाती रायडूने त्याच्या वेगवेगळ्या आवडत्या गोष्टींचा खुलासा केला आहे.

हार्दिक चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत करोडो रुपयांचे घड्याळ घालून पाकिस्तान विरुद्ध सामन्यात खेळण्यासाठी मैदानात आला होता. त्यानंतर सोशल मीडियावर तो खूप व्हायरल झाला. त्यानंतर काही दिवसांनी हार्दिकच्या ब्रेसलेटच्या चर्चा होत होत्या. आता आयपीएल 2025 मध्ये माजी चेन्नई सुपर किंग्सचा खेळाडू अंबाती रायडूने खुलासा केला आहे की, हार्दिक पांड्या फॅशनवर सुद्धा मोठा खर्च करतो. ड्रेसिंग रूम इन्सायडरशी चर्चा करताना त्याने सांगितले की, सर्व खेळाडूंमध्ये हार्दिक सर्वात महागडे कपडे खरेदी करतो आणि घालतो.

आयपीएल 2025 मध्ये मुंबईने खराब सुरुवात केली होती, पण आता त्यांनी सलग पाच सामने जिंकून अतिशय शानदार पद्धतीने पुनरागमन केले आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबईने 10 मधील 5 सामने जिंकून टॉप तीन मध्ये जागा बनवली आहे.

मुंबई इंडियन्स संघाने लखनऊ संघाचा रविवारी पराभव केला. मुंबई इंडियन्स सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे.

Comments are closed.