शेजारच्या देशात पहिल्यांदाच हिंदुस्थानचे खेळाडू पाडणार चौकार-षटकारांचा पाऊस, 1 डिसेंबरला टी-20 क्रिकेटचा धमाका होणार सुरू

हिंदुस्थानी खेळाडूंचा जलवा इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वांनीच पाहिला आहे. चौकार आणि षटकारांची चौफेर आतषबाजी हिंदुस्थानी चाहत्यांनी स्टेडियममध्ये बसून अनुभवली आहे. परंतू हाच थरार इतर देशांमधील चाहत्यांना अनुभवता येत नाही. त्यामुळे IPL सारख्या अनेक लीग विविध देशांमध्ये खेळल्या जाता. परंतु हिंदुस्थानी खेळाडू त्यामध्ये खेळताना दिसत नाहीत. मात्र, आता एक मोठी बातमी समोर आली असून लंका प्रीमियर लीगमध्ये (LPL) हिंदुस्थानी खेळाडू खेळताना दिसणार आहेत. या स्पर्धेत पहिल्यांदाच हिंदुस्थानी खेळाडू सहभागी होणार आहेत. 1 डिसेंबर ते 23 डिसेंबर दरम्यान ही स्पर्धा खेळली जाणार आहे.
लंका प्रीमियर लीगचा सहावा हंगाम हिंदुस्थानी खेळाडूंच्या उपलब्धीमुळे विशेष ठरणार आहे. हिंदुस्थानातले कोणते खेळाडू या स्पर्धेत खेळणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु हिंदुस्थानातील देशांतर्गत क्रिकेट खेळणारे आणि काही टीम इंडियाचे माजी खेळाडू LPL मध्ये सहभागी होणार आहेत. 5 संघांचा या स्पर्धेत सहभाग असून एकूण 24 सामने खेळले जाणार आहेत. ज्यामध्ये साखळी फेरीत 20 सामने आणि 4 नॉकआउट सामन्यांचा समावेश असेल. हे सर्व सामने श्रीलंकेतील आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय स्डेयिम (कोलंबो), पल्लेकेले आंतरराष्ट्री स्टेडियम (कॅंडी) आणि रंगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम (दांबुला) या ठिकाणी खेळले जाणार आहेत.
Comments are closed.