रेल्वेनं आणली नवी योजना, प्रवास खर्चावर 20 टक्के सूट देणार, कोणत्या प्रवाशांना सूट मिळणार?

नवी दिल्ली : भारतात रेल्वेनं कोट्यवधी प्रवासी प्रवास करतात. रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी हजारो ट्रेन चालवल्या जातात. रेल्वेनं प्रवाशांना दिलासा देण्यासाठी राऊंड ट्रिप पॅकेज योजना जाहीर केली आहे. या योजनेद्वारे रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांना रिटर्न तिकीट बुक केल्यास 20 टक्के सूट मिळणार आहे. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध असेल. सध्या ही सुविधा प्रायोगिक पातळीवर सुरु करण्यात आली आहे. रेल्वे प्रवासात तिकिटावर सूट देण्यासंदर्भात  भारतीय रेल्वेचे काय नियम आहेत ते जाणून घेऊयात.

रेल्वेकडून 20 टक्के सूट जाहीर

देशात जेव्हा सणांचा हंगाम असतो तेव्हा प्रवासी मोठ्या प्रमाणावर रेल्वेनं प्रवास करतात. या काळात लोकांना भारतीय रेल्वेकडून विशेष ट्रेन किंवा समर स्पेशल ट्रेन देखील चालवल्या जातात. रेल्वेकडून यासाठी वेगवेगळी व्यवस्था केली जाते. यावर्षी भारतीय रेल्वेनं दिवाळीच्या निमित्तानं गर्दीचं नियंत्रण करण्यासाठी राऊंड ट्रिप पॅकेज योजना जाहीर केली आहे. या योजनेत प्रवासी दिलेल्या मुदतीत रिटर्न तिकीट बुक करत अशेल तर त्याला प्रवासभाड्यावर 20 टक्के सूट मिळेल.

योजना कधी पासून सुरु होणार

रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार 14 ऑगस्टपासून ही योजना सुरु होणार आहे. या योजनेनुसार प्रवासी 13 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर दरम्यानची तिकीटं बुक करु शकतात. तर, रिटर्न तिकीट 17 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2025 चं  तिकीट कनेक्टिंग जर्नी पर्याय वापरुन बुक करावं लागेल.

भारतीय रेल्वेनं ही योजना लागू करताना काही नियम निश्चित केले आहेत. या योजनेचा लाभ अशा प्रवाशांना मिळेल जे दोन्ही तिकिटं आपल्या नावानं बुक करतील, याशिवाय ती एकाच क्लासमधील असतील. जर पहिलं तिकीट काऊंटरवरुन बुक केलं असूल तर दुसरं देखील काऊंटरवरुनच बुक करावं लागेल.

समजा एखाद्या प्रवाशानं आयआरसीटीसी च्या वेबसाईट किंवा एपवरुन पहिलं तिकीट बुक केलं असेल तर दुसरं तिकीट देकील आयआरसीटीसीच्या वेबसाइट आणि एपवरुन बुक करावं लागेल. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी कनेक्टिंग जर्नी फीचरचा वापर करावा लागेल. या योजनेतील सूट कन्फर्म तिकीटांवर लागू असेल. वेटिंग किंवा आरएसी या तिकिटांना लागू नसेल.

आणखी वाचा

Comments are closed.