भारतीय रेल्वे नियम : गाड्यांमधील 'या' चुका पडतील महागात; 10,000 पर्यंत दंड, तुरुंगात जाण्याची शक्यता

भारतीय रेल्वे नियम | भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि रेल्वे परिसरात शिस्त राखण्यासाठी नियम कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या नवीन कायदेशीर सुधारणांनंतर, रेल्वेतील विविध गैरप्रकारांना आता अधिक कठोरपणे हाताळले जाईल, काही प्रकरणांमध्ये 10,000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. तसेच, गंभीर प्रकरणांमध्ये कोर्टात हजेरी लागू शकते. रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सुधारित नियमांची अंमलबजावणी १ जुलैपासून सुरू होण्याची शक्यता आहे.

विना तिकीट प्रवास महागणार आहे

तिकीट न काढता रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी आता दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे. यापुढे, कोणीही विना तिकीट प्रवास करताना पकडल्यास किमान 500 रुपये दंड आणि संबंधित भाडे भरावे लागेल. दंड भरण्यास नकार दिल्यास न्यायालयीन कारवाई होऊ शकते.

दुसऱ्याच्या तिकिटावर प्रवास केल्यास कारवाई

दुसऱ्याच्या नावाने तिकीट काढून प्रवास करणाऱ्यांवरही कडक कारवाई केली जाईल. अशा प्रवाशांची तिकिटे जप्त करून त्यांच्याकडून अतिरिक्त भाडे व दंड वसूल केला जाईल. भारतीय रेल्वे नियम

रेल्वे परिसरात भीक मागणे, फेरीवाल्यांना बंदी

नवीन नियमांनुसार रेल्वे स्थानक आणि गाड्यांमध्ये अनधिकृत फेरीवाले आणि भिकारी यांना 2 हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे. तसेच पुनरावृत्ती करणाऱ्यांना एक वर्षापर्यंतच्या कारावासाची तरतूद आहे.

गोंधळ, शिवीगाळ केल्याबद्दल दंड

ट्रेनमध्ये किंवा स्थानकात अडथळा निर्माण करणे, अश्लील किंवा अपशब्द वापरणे, इतर प्रवाशांना त्रास देणे किंवा रेल्वेच्या कामात अडथळा निर्माण करणे यासाठी 1,000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. याशिवाय, दारू किंवा अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तींना रेल्वे किंवा स्थानकातून हाकलून दिले जाईल.

महिलांच्या डब्यात विनापरवाना प्रवेश केल्यास मोठा दंड

महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यातून बेकायदेशीरपणे प्रवास करणाऱ्या पुरुष प्रवाशांना 2,500 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. तसेच, संबंधित व्यक्तीला तात्काळ कोचमधून उतरवले जाईल. भारतीय रेल्वे नियम

प्रतिबंधित किंवा धोकादायक वस्तू रेल्वेच्या आवारात आढळल्यास किमान 10,000 रुपये दंड आकारला जाऊ शकतो. यासोबतच संबंधित व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाईही करण्यात येणार आहे.

Comments are closed.