भारतीय संघाचा मोठा पराक्रम! 'या' ऐतिहासिक वर्ल्ड रेकाॅर्डशी केली बरोबरी
टीम इंडिया रेकॉर्डः भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे, ज्यात भारतीय संघ 1-2 ने पिछाडीवर आहे. आता भारतीय संघाकडे पाचवा कसोटी सामना जिंकून मालिका बरोबरीत आणण्याची सुवर्णसंधी आहे. भारतीय फलंदाजांनी या कसोटी मालिकेत असे प्रदर्शन केले आहे, ज्याची तुलना मिळणे कठीण आहे. भारतीय खेळाडूंनी इंग्लिश गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे. (India vs England Test Series Records)
भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्धच्या सध्याच्या कसोटी मालिकेत (IND vs ENG Test Series) आतापर्यंत एकूण 12 शतके झळकावली आहेत. याचबरोबर भारतीय संघाने एका कसोटी मालिकेत सर्वाधिक शतके ठोकण्याच्या जागतिक रेकाॅर्डची बरोबरी केली आहे. पाकिस्तानने 1982/83 मध्ये भारतीय संघाविरुद्धच्या कसोटी मालिकेत, दक्षिण आफ्रिकेने 2003/04 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत आणि ऑस्ट्रेलियाने 1955 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत प्रत्येकी 12-12 शतके ठोकली होती. आता भारतीय संघाने यांच्या रेकाॅर्डशी बरोबरी केली आहे. (Team India World Record)
भारतीय क्रिकेट संघाकडून इंग्लंडविरुद्धच्या सध्याच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक शतके शुबमन गिलने झळकावली आहेत. त्याने 4 शतके ठोकली आहेत. केएल राहुल, यशस्वी जयस्वाल आणि रिषभ पंतच्या बॅटमधून प्रत्येकी 2-2 शतके निघाली आहेत. तर खालच्या फळीत फलंदाजीला आलेल्या रवींद्र जडेजाने आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी 1-1 शतक झळकावले आहे. या खेळाडूंमुळेच हा मोठा करिश्मा शक्य झाला आहे. (Most Centuries in Test Series)
शुबमन गिल, केएल राहुल, जयस्वाल, पंत, जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी बॅटने आपले कौशल्य दाखवले आहे. या सर्व खेळाडूंनी महत्त्वाच्या वेळी संघासाठी संयमी फलंदाजी केली आहे आणि इंग्लंडला त्यांच्याच भूमीवर कडवी टक्कर दिली आहे. भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात 336 धावांनी विजय मिळवला होता. त्याला तिसरा कसोटी सामना जिंकण्याचीही संधी होती, परंतु शेवटी संघाला 22 धावांनी पराभव पत्करावा लागला.
Comments are closed.