चॅम्पियन्स ट्रॉफी: बेंचवर बसलेल्या खेळाडूंनाही करोडोंचा फायदा! प्रत्येकाला मिळणार इतकी बक्षीस रक्कम

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंडला चार विकेट्सने हरवून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे विजेतेपद पटकावले. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने एकही सामना गमावला नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर भारतीय संघाला 20 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली. आता बीसीसीआयनेही चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याबद्दल भारतीय संघासाठी 58 कोटी रुपयांची मोठी घोषणा केली आहे. ही बक्षीस रक्कम 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघातील सदस्य, प्रशिक्षक कर्मचारी आणि निवड समितीमध्ये वितरित केली जाईल. कोणाला किती पैसे मिळतील ते जाणून घेऊया.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बक्षीस रकमेची घोषणा केली आहे. त्यापैकी, भारतीय संघातील प्रत्येक सदस्य आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी प्रत्येकी 3 कोटी रुपये मिळतील. तर उर्वरित सपोर्ट स्टाफ आणि निवड समितीच्या प्रत्येक सदस्याला प्रत्येकी 50 लाख रुपये मिळतील.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात रिषभ पंत, अर्शदीप सिंग आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश करण्यात आला. परंतु या खेळाडूंना चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी कोणत्याही सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग बनवण्यात आले नाही. हे भारतीय खेळाडू संपूर्ण स्पर्धेत बेंचवर बसले आणि स्पर्धेत एकही सामना न खेळता चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेते बनले. आता या खेळाडूंना चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे विजेतेपद जिंकल्याबद्दल प्रत्येकी 3 कोटी रुपये मिळतील.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाच सामने खेळले आणि ते सर्व जिंकले. या पाचही सामन्यांमध्ये कर्णधार रोहितने नाणेफेक गमावली. भारतीय क्रिकेट संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या एका हंगामात सर्व सामन्यांमध्ये नाणेफेक गमावणारा आणि नंतर विजेतेपद जिंकणारा पहिला संघ बनला. यापूर्वी कोणत्याही संघाला हे करता आले नव्हते.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.

Comments are closed.