हिंदुस्थानचा टेकबॉलमधील पहिला ऑलिम्पिक प्रवास, बहरीनमध्ये अथर्व सकपाळची दमदार कामगिरी

बहरीन येथे पार पडलेल्या एशियन युथ ऑलिम्पिक गेम्स 2025 मध्ये टेकबॉल या उदयोन्मुख खेळ प्रकारात हिंदुस्थानचा संघ पहिल्यांदाच उतरला, ही इतिहासात नोंद होणारी घटना ठरली. या ऐतिहासिक संघात मुंबईच्या अथर्व सकपाळने स्थान मिळवत अभिमानास्पद कामगिरी बजावली.
अथर्वने कुरुष एकेरी प्रकारात नववा क्रमांक पटकावत हिंदुस्थानचा झेंडा उंचावला. ही कामगिरी त्यांच्या सातत्य, मेहनत आणि दृढनिश्चयाचे द्योतक मानली जात आहे. याआधी अथर्वने नाशिक येथे 13 ते 16 जून 2025 दरम्यान झालेल्या प्रथम युथ टेकबॉल नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मेन सिंगल्स प्रकारात देशात प्रथम क्रमांक पटकावत सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर कोइंबतूर येथे आयोजित 12 दिवसीय सराव शिबिरात उत्पृष्ट कामगिरी करून त्याने एशियन युथ ऑलिम्पिकसाठी हिंदुस्थानी संघात स्थान निश्चित केले.
शिवसेनेची WHOतुकाची थाप
अथर्वच्या या यशाबद्दल महाराष्ट्रभरातून काwतुकाचा वर्षाव होत आहे. शिवसेना नेते-आमदार सुनील प्रभू यांनी मालाड (कुरार) येथील अथर्वच्या घरी जाऊन त्याचा सत्कार केला आणि कुढील वाटचालीसाठी मनःकूर्वक शुभेच्छा दिल्या. टेकबॉल हा अजून नव्याने उदयास येत असलेला खेळ असला तरी अथर्व आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे तो हिंदुस्थानात लोकप्रियतेच्या झोतात येत आहे. त्यांच्या या यशाने नव्या पिढीला प्रेरणा मिळत असून टेकबॉलच्या माध्यमातून हिंदुस्थान क्रीडा क्षेत्रात नवी दिशा मिळवेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
 
			 
											
Comments are closed.