अमेरिकेत हिंदुस्थानी ट्रक चालकाने अनेक गाड्यांना उडवलं, तिघांचा मृत्यू; घटनेचा थरार कॅमेऱ्यामध्ये कैद

अमेरिकेत हिंदुस्थानी ट्रक चालकाने दारुच्या नशेत अनेक गाड्यांना उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भयंकर अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. 21 वर्षीय जसप्रीत सिंग हा तरुण नशेमध्ये ट्रक चालवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले असून, त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा थरार ट्रकच्या डॅश कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.

सदर अपघात दक्षिण कॅलिफॉर्नियामधील सॅन बर्नाडिनो काउंटी फ्रीवेवर झाला आहे. जसप्रीत सिंग दारूच्या नशेमध्ये ट्रक चालवत असल्याचं आढळून आले आहे. भरधाव वेगात असणारा जसप्रीत सिंगचा ट्रक तीन गाड्यांना धडकल्याचे डॅश कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे. यामध्ये तिन्ही वाहनांचा चुरडा झाला असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे जसप्रीत सिंगने अवैधरित्या अमेरिकेमध्ये प्रवेश केल्याच सुद्धा तपासात उघडं झालं आहे.

Comments are closed.