Gen Z आंदोलकांनी हॉटेलला आग लावली, पळून जायच्या प्रयत्नात असलेल्या हिंदुस्थानी महिलेचा मृत्यू

नेपाळमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारात एका हिंदुस्थानी महिलेचा मृत्यू झाला आहे. राजेश गोला असे त्या महिलेचे नाव असून ती आपल्या पती सोबत नेपाळ फिरायला गेली होती.
मूळच्या उत्तर प्रदेशमधील गाझियाबादच्या असलेल्या राजेश गोला (57) या त्यांचा पती रामवीर सिंग गोला यांच्यासोबत नेपाळला 7 सप्टेंबर रोजी आल्या होत्या. काठमांडूतील हयात रिजेन्सीमध्ये ते उतरले होते. 10 सप्टेंबरला आंदोलकांनी त्यांच्या हॉटेलला आग लावली. त्यावेळी बचावकर्त्यांनी हॉटेलच्या बाहेर गाद्या घातल्या होत्या व हॉटेलमधील पर्यटकांना खिडकीतून उडी मारायला सांगितली. गोला दाम्पत्य हे चौथ्या माळ्यावरील खोलीत होतं. त्यांनी देखील खिडकीतून उडी मारली. यात रामवीर हे किरकोळ जखमी झाले मात्र राजेश गोला या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आलं. मात्र तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
हुकूमशाही आणि भ्रष्टाचाराविरुद्ध नेपाळमध्ये तरुणांनी उठाव केल्यानंतर देशात अराजक पसरले असून हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू झाला तर 1300 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
Comments are closed.