कॅनडामध्ये हिंदुस्थानी महिलेची घरात घुसून हत्या
कॅनडामध्ये राहणाऱ्या हिंदुस्थानी महिलेची घरात घुसून चाकू भोसकून निर्दयीपणे हत्या करण्यात आली. नॅन्सी ग्रेवाल (वय 45) असे या महिलेचे नाव असून, ती मूळची पंजाबी वंशाची होती.
कॅनडातील विंडसर येथे राहणाऱ्या नॅन्सी ग्रेवालच्या घरात घुसून एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर सपासप वार करत त्यांना चाकूने भोसकले. गंभीर जखमी झालेल्या नॅन्सी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, गंभीर दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नॅन्सी या सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर आणि यूटय़ूबर असल्याचे सांगितले जाते. पॅनडा पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
Comments are closed.