फरार आरोपीवर 42 लाखांचे बक्षीस

अमेरिकेत 2017 साली हिंदुस्थानी महिला शशिकला नर्रा (38) आणि तिचा 6 वर्षांचा मुलगा अनीश नर्रा या दोघांची निर्घृपणपणे हत्या करणारा फरार आरोपी नजीर हमीदवर अमेरिकेने 50 हजार डॉलरचे बक्षीस ठेवले आहे. एफबीआयने नजीरला मोस्ट वाँटेडच्या यादीत टाकले असून त्याची माहिती देणाऱयास 50 हजार डॉलर म्हणजेच 42 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. 23 मार्च 2017 ला अमेरिकेतील न्यू जर्सी येथील अपार्टमेंटमध्ये या आई-मुलाचे मृतदेह सापडले होते. या दोघांची चाकू भोसकून हत्या केली.

Comments are closed.