भारतीय संघानं मोडला 8 वर्ष जुना विक्रम, या खेळाडूनं ठोकलं करिअरचं पहिलं शतक

सध्या भारतीय महिला क्रिकेट संघ आयर्लंड विरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. मालिकेतील दुसरा सामना राजकोट येथे खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियानं 8 वर्ष जुना विक्रम मोडत नवा इतिहास रचला.

भारतानं प्रथम फलंदाजी करताना 380 धावा केल्या, जी संघाची वनडे क्रिकेटमधील सर्वात मोठी धावसंख्या आहे. यापूर्वी 2017 मध्ये टीम इंडियानं बडोद्यात आयर्लंडविरुद्ध दोन विकेट गमावून 358 धावा केल्या होत्या. या सामन्यात भारतीय संघाची फलंदाज जेमिमा रॉड्रिग्सनं उत्कृष्ट शतक झळकावलं. हे तिच्या एकदिवसीय कारकीर्दीतील पहिलं शतक आहे. टीम इंडियाची फलंदाजी इतकी आक्रमक होती की, पहिल्या चार फलंदाजांनी 50 पेक्षा अधिक धावा करत विरोधी गोलंदाजांचा धुव्वा उडवला.

स्मृती मंधानाच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघानं पहिला एकदिवसीय सामना सहज जिंकला होता. या सामन्यातही स्मृतीनं संघाला उत्कृष्ट सुरुवात करून देत 54 चेंडूत 73 धावांची शानदार खेळी केली. यानंतर युवा फलंदाज प्रतिका रावलनं 61 चेंडूत 67 धावांची खेळी केली. रावलनं मंधाना सोबत पहिल्या विकेटसाठी 19 षटकांत 159 धावांची जबरदस्त भागीदारी केली.

यानंतर भारताची स्टार फलंदाज हरलिननं 84 चेंडूत 89 धावांची धडाकेबाज खेळी केली. तिनं तिसऱ्या विकेटसाठी जेमिमाहसोबत 28 षटकांत 183 धावा जोडल्या. त्यानंतर टीमची धावसंख्या पुढे नेण्याचं काम जेमिमानं केलं. तिनं वनडे क्रिकेटमध्ये आपलं पहिलं शतक झळकावलं. जेमिमाहनं 90 चेंडूत 112.08 च्या सरासरीनं 102 धावा ठोकल्या. तिनं आपल्या खेळीत 12 चौकार लगावले. तिच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियानं शेवटच्या 10 षटकांत 100 हून अधिक धावा ठोकल्या.

हेही वाचा –

ऐकून विश्वास बसणार नाही! युवराज सिंगच्या वडिलांनी केली चक्क धोनीची प्रशंसा; VIDEO व्हायरल
हार्दिक-संजू संघात असताना अक्षर पटेलला उपकर्णधार का बनवलं? 3 प्रमुख कारणं जाणून घ्या
बीसीसीआयला नवे सचिव मिळाले, माजी खेळाडूने घेतली जय शाहंची जागा

Comments are closed.