भारताने जिंकला खो-खो विश्वचषक..! फायनलमध्ये नेपाळचा धुव्वा उडवत रचला इतिहास

भारतीय महिला संघाने (India Women’s Team) पहिला खो-खो विश्वचषक (Kho-Kho World Cup) जिंकला आहे. रविवारी (19 जानेवारी) नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये स्पर्धेचा फायनल सामना खेळला गेला. फायनलमध्ये भारताने नेपाळचा 78-40च्या मोठ्या फरकाने पराभव करून विजेतेपदावर आपले नाव कोरत इतिहास रचला.

खो-खो विश्वचषक (Kho-Kho) (13 ते 19 जानेवारी) दरम्यान नवी दिल्ली येथे खेळवण्यात आला. भारतीय संघ या स्पर्धेत अपराजित राहिला, तर नेपाळला फायनल सामन्यातच पहिला पराभव पत्करावा लागला. भारतीय पुरुष संघानेही फायनल फेरीत प्रवेश केला आहे, त्यांचा सामनाही नेपाळशी होणार आहे.

महिला खो-खो विश्वचषकाचा फायनल सामना रविवारी (19 जानेवारी) संध्याकाळी 6 वाजता सुरू झाला. नेपाळने टाॅस जिंकला आणि बचाव करण्याचा निर्णय घेतला. भारताने पहिल्या डावात एकतर्फी वर्चस्व दाखवले आणि 34 गुण मिळवले. दुसऱ्या डावात नेपाळने आक्रमण करत 24 गुण मिळवले, या वळणावर भारतालाही 1 गुण मिळाला. हाफ टाईमनंतर भारताने 35-24 अशी आघाडी कायम ठेवली.

तिसऱ्या डावात भारताचे वर्चस्व दिसून आले. या वळणावर संघाने 38 गुण मिळवत चौथा डाव 73-24 असा आपल्या नावावर केला. चौथ्या आणि शेवटच्या डावात नेपाळला केवळ 16 गुण करता आले, तर भारताचे 5 गुण झाले. 78-40 च्या गुणांसह फायनल सामना संपला आणि भारतीय महिला संघ पहिला विश्वचषक विजेता ठरला.

महत्त्वाच्या बातम्या-

चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी यशस्वी जयस्वालला भारतीय संघात स्थान का? कर्णधाराने सांगितले कारण
भारताचा पुढचा कर्णधार कोण? सुरेश रैनाने सांगितले ‘या’ खेळाडूचे नाव
संजू सॅमसनला चॅम्पियन्स ट्रॉफीतून का वगळण्यात आलं? खरं कारण जाणून घ्या

Comments are closed.