पाकिस्तानच्या आशा जिवंत, आता बांगलादेश ठरवणार नशिब!
पाकिस्तान संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. भारतीय संघाने पाकिस्तान ला 6 विकेट्सने पराभूत करून चांगलाच धुव्वा उडवला. या आधीच्या सामन्यात पाकिस्तानला न्यूझीलंड संघाने 60 धावांनी पराभूत केले होते. आता भारतीय संघाकडूनही पराभव पत्करल्यानंतर पाकिस्तान संघ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या बाहेर पडला आहे का हे प्रश्न उपस्थित होत आहेत. की पाकिस्तान संघ सेमीफायनल सामन्यामध्ये जाण्याची काही शक्यता उरली आहे का? चला तर जाणून घ्या की अंतिम 4 संघात स्थान मिळवण्यासाठी कसं दुसऱ्या संघावर अवलंबून राहावं लागतं?
पाकिस्तान संघाला जर सेमीफायनल सामन्यामध्ये पोहोचायचे असेल तर, सगळ्यात आधी त्यांना बांगलादेश संघाला पराभूत करावे लागेल. नेट रन रेटचा विचार करता पाकिस्तानला बांगलादेश विरुद्ध खूप मोठा विजय मिळवावा लागेल. याशिवाय पाकिस्तान संघाचा कर्णधार मोहम्मद रिजवान आणि अन्य खेळाडूंनाही हाही विचार करावा लागेल की भारत आणि बांगलादेशला, न्यूझीलंड विरुद्ध विजय मिळावा.
कारण जर न्यूझीलंड संघ पुढच्या सामन्यांमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्या विरुद्ध हरला तर पाकिस्तान संघाच्या आशा जिवंत राहू शकतात. दुसरीकडे जर पाकिस्तान संघ बांगलादेशला पराभूत करू शकला तर, तीन संघ बरोबरी करतील. त्यानंतर सेमीफायनलचा निर्णय नेट रन रेटच्या आधारावर घेतला जाईल. आता पाकिस्तान संघाचा नेट रन रेट – 1.087 आहे. त्यामुळे त्यांना बांगलादेशविरुद्ध मोठा विजय मिळवावा लागणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील अ गटात भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश संघ आहेत. तसेच या गटातील तीन सामने खेळले गेले आहेत आणि अजून तीन सामने खेळायचे आहेत. 24 फेब्रुवारी रोजी बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड संघात सामना खेळला जाणार आहे. त्यानंतर 27 फेब्रुवारीला बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान सामना होणार आहे. तसेच या गटातील शेवटचा सामना 2 मार्च रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे.
हेही वाचा
IND vs PAK: भारतासह पाकिस्तानमध्येही किंग कोहलीच्या नावाचा जयघोष, पाहा व्हिडिओ!
रोहितने या खेळाडूंना दिले विजयाचे श्रेय, कोहलीबद्दलही दिली भावनिक प्रतिक्रिया!
‘प्रामाणिकपणे सांगायचे तर…’, टीम इंडियाच्या विजयानंतर किंग कोहलीचे हृदयस्पर्शी वक्तव्य
Comments are closed.