हरमनप्रीतची ऐतिहासिक कामगिरी! सर्वात ज्येष्ठ ICC विजेत्या कर्णधारांच्या यादीत अव्वल
भारतीय महिला क्रिकेटचा सुवर्णक्षण! हरमनप्रीत कौरने आयसीसी महिला विश्वचषक 2025 जिंकत इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. ती ICC ट्रॉफी जिंकणारी सर्वात वयस्कर महिला कर्णधार ठरली आहे. 36 वर्षे आणि 239 दिवसांच्या वयात तिने हा पराक्रम साध्य केला. नवी मुंबईत झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी पराभूत करून पहिला ICC किताब आपल्या नावावर केला.
या विजयासह हरमनप्रीतने न्यूझीलंडच्या सोफी डिवाइनचा विक्रम मोडला. डिवाइनने 2024 मध्ये टी20 विश्वचषक जिंकताना 35 वर्षे आणि 49 दिवसांचे वय गाठले होते. त्या वेळी तिच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला 32 धावांनी पराभूत केले होते.
तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाची माजी कर्णधार बेलिंडा क्लार्क आहे. तिने 2005 मध्ये 34 वर्षे आणि 212 दिवसांच्या वयात ऑस्ट्रेलियाला वनडे विश्वचषक जिंकवून दिला होता, ज्यात भारतावर 98 धावांनी विजय मिळवला गेला होता.
चौथ्या स्थानावर पुन्हा ऑस्ट्रेलियाची शेरोन ट्रेड्रिया असून, तिने 1988 मध्ये 34 वर्षे आणि 171 दिवसांच्या वयात विश्वचषक जिंकला. त्या वेळी तिच्या संघाने इंग्लंडचा 8 विकेट्सने पराभव केला होता.
पाचव्या क्रमांकावर मेग लॅनिंगचे नाव आहे. 30 वर्षे आणि 338 दिवसांच्या वयात तिने 2023 टी20 विश्वचषक जिंकून ऑस्ट्रेलियाला आणखी एक किताब मिळवून दिला.
हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारताचा हा पहिला ICC विजेतेपदाचा क्षण होता. तिच्या शांत पण जोशपूर्ण नेतृत्वाने भारतीय महिला क्रिकेटला नवा आत्मविश्वास दिला आहे.
Comments are closed.