विराट कोहली पुन्हा कसोटी कर्णधार होणार की निवृत्ती घेणार? जाणून घ्या एका क्लिकवर
दिग्गज क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) याआधीच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार राहिला आहे आणि सध्या तो भारतीय संघाकडून फलंदाज म्हणून खेळत आहे. विराटने आतापर्यंत क्रिकेटमध्ये अनेक ऐतिहासिक रेकाॅर्ड केले आहेत. पण विराटच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याच्या बातम्या सोमर येत आहेत. पण विराट कोहलीने त्याच्या कसोटीच्या निवृत्तीबाबत कोणतीही अपडेट दिलेली नाही.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, विराट कोहलीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी (BCCI) कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याबाबत बोलले आहे. वृत्तानुसार, कोहली इंग्लंड दौऱ्यापूर्वीच निवृत्तीची घोषणा करू शकतो. परंतु यामागील कारण कुठेतरी बीसीसीआय असल्याचेही सांगितले जात आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, विराट कोहलीने बीसीसीआयशी कसोटी क्रिकेटचा कर्णधार होण्याबाबत बोलले होते. त्याच वेळी, बोर्ड सध्या एका युवा खेळाडूकडे कसोटी संघाची कमान सोपवण्याचा विचार करत आहे. बीसीसीआय शुबमन गिलला (Shubman Gill) भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार बनवू शकते. त्याच वेळी, या सर्व गोष्टींसह, विराट कोहलीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आलं आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपासून (Border Gavaskar Trophy) विराट कोहली त्याच्या कसोटी कारकिर्दीबद्दल विचार करत असल्याचेही समोर येत आहे. 2024 मध्ये ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या या मालिकेत विराटची कामगिरी फारशी खास नव्हती. या स्पर्धेत त्याने 9 डावात फक्त 190 धावा केल्या, ज्यामध्ये त्याने 1 शतक झळकावले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात विराटने शतक झळकावले, परंतु त्यानंतर संपूर्ण मालिकेत त्याची बॅट शांत राहिली. या मालिकेत विराटचा सरासरी धावसंख्या 23.75 राहिली होती.
Comments are closed.