भारतातील मेट्रो बांधकामाचा वेग विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे
2-3 वर्षांमध्ये अमेरिकेला टाकणार मागे : केंद्रीय मंत्री खट्टर यांचा दावा
सर्कल/हैदराबाद
भारत जलदपणे मेट्रो नेटवर्क विस्ताराच्या दिशेने वाटचाल करत असून आता देश जगातील सर्वात लांब मेट्रोमार्गांच्या देशांमध्ये सामील होण्याची तयारी करत आहे. केंद्रीय शहरविकासमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी भारत पुढील 2-3 वर्षांमध्ये अमेरिकेला मेट्रो नेटवर्कच्या एकूण लांबीत मागे टाकणार असल्याचा दावा मंगळवारी केला आहे. देशात शहरीकरण वाढण्यासोबत मेट्रो संपर्कव्यवस्थेवरून सरकारच्या प्राथमिकता सातत्याने गतिमान झाल्या असून याचाच परिणाम भारत आता जागतिक स्तरावर स्वत:ची नवी ओळख निर्माण करत आहे. भारताचे मेट्रो नेटावर्क 1100 किलोमीटरपर्यंत पोहोचले आहे, तर अमेरिकेत हे प्रमाण 1400 किलोमीटर आहे. मेट्रो विस्ताराचा वेग पाहता भारत अत्यंत लवकरच अमेरिकेला मागे टाकेल. 2004-05 मध्ये केवळ 5 शहरांमध्ये मेट्रो सेवा सुरू होती, परंतु आता 24 शहरांमध्ये मेट्रो नेटवर्क कार्यान्वित आहे. अमेरिका आणि चीनने भारताच्या खूप अगोदर मेट्रोसेवेवर काम सुरू केले होते, परंतु भारताने अत्यंत कमी कालावधीत वेगाने नेटवर्कचा विस्तार केल्याचे खट्टर यांनी हैदराबामध्ये आयोजित दक्षिण-पश्चिम राज्यांच्या शहरविकास मंत्र्यांच्या क्षेत्रीय बैठकीला संबोधित करताना म्हटले आहे.
वेगाने वाढतेय शहरीकरण
देशात शहरीकरण वेगाने वाढत असून 2050 पर्यंत शहरे एकूण जीडीपीत 80 टक्के योगदान देतील असा अनुमान आहे. अशास्थितीत मेट्रोरेल सारखी आधुनिक आणि जलद परिवहन व्यवस्था अत्यंत आवश्यक ठरली आहे. शहरांमध्ये आर्थिक घडामोडी, नोकरी,शिक्षण आणि परिवहनाच्या वाढत्या गरजांसोबत मेट्रो आता आधुनिक शहरी सुविधांचा सर्वात महत्त्वाचा हिस्सा ठरला आहे आणि सरकार या देशाने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले.
हैदराबादच्या विकासप्रकल्पांना समर्थन
केंद्र सरकार तेलंगणात शहरविकास प्रकल्पांना पूर्ण समर्थन देईल. यात हैदराबाद मेट्रो विस्तार, मूसी नदी पुनर्विकास आणि अन्य शहर सुधारणा प्रकल्प सामील आहेत. राज्य सरकारच्या प्राथमिकतांनुसार केंद्र आवश्यक सहकार्य देईल. तेलंगणाची राजधानी हैदराबादला वेगाने विस्तार आणि गुंतवणुकीचे शहर म्हणून विकसित करण्यासाठी केंद्र आणि राज्यादरम्यान सहकार्य महत्त्वाचे असल्याचे खट्टर यांनी बैठकीत नमूद केले.
त्वरित मंजुरीची मागणी
तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी बैठकीत राज्याचे अनेक प्रमुख प्रकल्प केंद्राच्या मंजुरीची प्रतीक्षा करत असल्याचे सांगितले. फेज-2 मेट्रो विस्तार, मूर्सी पुनर्विकास, गोदावरी नदी डायवर्जन आणि रीजनल रिंग रोडसारख्या प्रकल्पांवर त्वरित मंजुरीची मागणी त्यांनी केली. राज्य सरकार हैदराबादाला जगातील सर्वात ‘हॅपनिंग ग्लोबल सिटी’चे स्वरुप देण्याच्या दिशेने मोठे पायाभूत प्रकल्प सुरू करत असून यात केंद्राचे सहकार्य आवश्यक असल्याचे रेड्डी यांनी म्हटले आहे.
विश्वविक्रमाच्या दिशेने भारत
भारताने 1100 किलोमीटरहून अधिक मेट्रो नेटवर्क तयार पेल आहे आणि ज्या वेगाने देशात नवे मेट्रो प्रकल्प सुरू आहेत, ते पाहता सरकारचा दावा बऱ्याचअंशी व्यवहारिक मानला जात आहे. कमी कालावधीत भारताची शहरी परिवहन व्यवस्था जगासाठी अनुकरणीय मॉडेल ठरल्याचे तज्ञांचे सांगणे आहे.
Comments are closed.