'डमी फायटर जेट' च्या माध्यमातून भारताचा मनाचा खेळ

क्षेपणास्त्र सुरक्षेवर पाकिस्तानकडून चूक : ब्राह्मोसने घडविला विध्वंस

ऑपरेशन सिंदूरनंतर सुरू झालेला भारत-पाकिस्तान यांच्यातील 86 तासांचा संघर्ष टॅक्टिकल वॉरफेयरच्या रोमांचक कहाण्यांनी युक्त आहे. 4 दिवसांची ही लढाई वेगवान कारवाई, तांत्रिक बुद्धिमता आणि शत्रूला चकित करणारी कहाणी आहे. या संघर्षात भारताने 9-10 मे रोजी पाकिस्तानचे हवाई सामर्थ्य नेस्तनाबूत केले.

या संघर्षात यशामागे ब्राह्मोसारख्या अचूक निशाणा साधणाऱ्या क्षेपणास्त्रांचे योगदान तर आहेच, परंतु भारतीय वायुदलाच्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानला चकविण्यासाठी खेळलेला माइंड गेम देखील तितकाच चकित करणारा आहे. पाकिस्तानी अधिकारी भारताच्या चक्रव्यूहात अडकले आणि यानंतर ब्राह्मोस क्षेपणास्त्रांनी सुरू केला डिस्ट्रक्शन गेम.

भारताने या माइंड गेममध्ये डमी जेट्सची मदत घेतली. हे जेट्स शत्रच्या रडावर लढाऊ विमानाप्रमाणे दिसत होते. शत्रूने यांना खरी लढाऊ विमाने समजविली आणि त्याला पाडविण्यासाठी स्वत:चे रडार आणि डिफेन्स सिस्टीमला सक्रीय केले. परंतु तोपर्यंत भारताला पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणेचा ठावठिकाणा कळला. यानंतर भारताने पाकिस्तानी वायुतळावर ब्राह्मोस क्षेपणास्त्रांचा वर्षाव सुरू केला. याच्याच मदतीने भारताने पाकिस्तानच्या वायुदलाचे कंबरडे मोडले. भारताच्या उच्च तंत्रज्ञान क्षमतेने पाकिस्तानात चीनच्या सहाय्याने संचालित होत असलेल्या क्षेपणास्त्र सुरक्षा प्रणालीला पंगू करून सोडले. भारताच्या प्रत्युत्तरादाखलच्या कारवाईचा दुसरा टप्पा दक्षिण आशियाई सैन्य इतिहासात दोन अण्वस्त्रसज्ज देशांदरम्यान आतापर्यंतच्या सर्वात साहसी आणि सामरिक स्व्रुपात महत्त्वाकांत्री प्रत्युत्तराच्या स्वरुपात नोंद झाला आहे.

पाकिस्तानवर कारवाई करण्यासाठी भारतीय वायुदलाकडे पाकिस्तानची रडार सिस्टीम आणि क्षेपणास्त्र सुरक्षा प्रणालीचा ठावठिकाणा माहित असणे आवश्यक होते. अशा स्थितीत सैन्याच्या युद्ध रणनीतिकारांनी तीक्ष्ण बुद्धिमतेचा परिचय दिला. पाकिस्तानी रडार आणि क्षेपणास्त्र प्रणालीचा शोध घेण्यासाठी भारतीय वायुदलाने एक डाव वापरला.

वायुदलाने सर्वप्रथम पाकिस्तानवर वैमानिकरहित विमानांनी हल्ला करण्याचा देखावा केला. हे डमी जेट होते, त्यांना स्वत:च्या हवाईक्षेत्रात पाहताच पाकिस्तानी वायुदलाने स्वत:च्या रडारला सक्रीय केले. तसेच पाकिस्तानची क्षेपणास्त्र सुरक्षा प्रणालीही सक्रीय झाली. यानंतर पाकिस्तानी हवाईक्षेत्रात भारताने धडक कारवाई सुरू केली. भारतीय वायुदलाने पाकिस्तानच्या वायुतळांवर हल्ले करत तेथील हवाई सुरक्षा प्रणाली नष्ट केली, ज्यात चीनची एचक्यू-9 क्षेपणास्त्र प्रणाली देखील सामील होती.

पाकिस्तानी वायुदलाने चकलाला वायुतळासमवेत अनेक ठिकाणी हवाई सुरक्षा प्रणाली तैनात केल्याची माहिती भारताला मिळाली. पाकिस्तानचा रडार आणि क्षेपणास्त्र सुरक्षा प्रणाली सक्रीय होताच भारतोन कामिकोज ड्रोन्स म्हणजेच हारोपने हल्ला केला. या हल्ल्यात पाकिस्तानची हवाई सुरक्षा प्रणाली नष्ट झाली. याचबरोबर भारताने ब्राह्मोस सुपरसानिक क्षेपणास्त्रांनी प्रहार सुरू केला. ब्राह्मोसच्या विध्वंसक क्षमतेने पाकिस्तानात खळबळ उडाली

पाकिस्तानी हवाईक्षेत्राला सर्वाधिक नुकसान ब्राह्मोस सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्रांसोबत राफेल लढाऊ विमानांवरील स्कॅल्प क्षेपणास्त्रांनी पोहोचविले. भारतीय वायुदलाने पाकिस्तानच्या वायुतळाला लक्ष्य करण्यासाठी जवळपास 15 ब्राह्मोस क्षेपणास्त्रs डागली. याचा उद्देश विमाने आणि अन्य ऑपरेशन लाँच करण्याची पाकिस्तानची क्षमता संपविणे होता.

या ऑपरेशनला यशस्वी करण्यात सर्वात मोठी भूमिका डमी जेट्सची राहिली. याला पाकिस्तानच्या रडार सिस्टीमने खरे लढाऊ विमान समजले आणि स्वत:चा ठावठिकाणा उघड केला. शत्रूचा रडार आणि एअर डिफेन्स नेटवर्क भारतीय विमानांना पाडविण्यासाठी सक्रीय झाले, अशास्थितीत भारतीय सैन्याने इस्रायलकडून निर्मित हारोप समवेत स्वत:च्या शस्त्रास्त्रांना त्यांच्यावर डागले आणि पाकिस्तानचा रडार आणि कमांड प्रणालींना लक्ष्य केले.

पाकिस्तानी वायुदलाने स्वत:च्या एचक्यू-9 हवाई सुरक्षा यंत्रणेचा लाँचर आणि रडारच्या पूर्ण सेटला वेगवेगळ्या स्थानांवर तैनात केले होते. परंतु यंत्रणा सक्रीय होताच त्यांचा ठावठिकाणा कळला. यानंतर भारतीय वायुदलोन पाकिस्तानी वायुतळांवर दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी हल्ला केला ज्यात ब्राह्मोस आणि स्कॅल्प क्षेपणास्त्रs सामील होती.

ब्राह्मोस आणि स्कॅल्प क्षेपणास्त्रांसह विमानांनी पश्चिम वायु कमांड आणि दक्षिण पश्चिम वायु कमांड क्षेत्रांमधील वेगवेगळ्या वायुतळांवर उड्डाण केले होते. विमानांनी पाकिस्तानी वायुदलाच्या जवळपास सर्व प्रमुख तळांवर हल्ला केला आणि त्यांच्या 13 पैकी 11 तळांना लक्ष्य करण्यात आले.

ब्राह्मोस आणि स्कॅल्पद्वारे करण्यात आलेल्या हल्ल्यात मुख्यकरून सिंधमधील पाकिस्तानी वायुतळावर हल्ला करण्यात आला, तेथे युएव्ही आणि एक हवाई देखरेख तसेच प्रारंभिक इशारा देणाऱ्या विमानाला मोठे नुकसान पोहोचले. वायुतळाचे नुकसान झाल्याने पाकिस्तानी वायुदलाला स्वत:च्या विमानांना तेथून मागे न्यावे लागले. तर भारताने पहिल्यांदाच ब्राह्मोस क्षेपणास्त्र प्रणालीचा एखाद्या संघर्षात वापर केला. यादरम्यान या सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्राने स्वत:च्या असीम क्षमतेला प्रदर्शित केले आहे.

Comments are closed.