भारताचा 'गोल्डन बाॅय' अडकला लग्नबंधनात, सोशल मीडियावर खास क्षणांची झलक
भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) लग्नबंधनात अडकला आहे. रविवारी (19 जानेवारी) रात्री सोशल मीडियावर फोटो शेअर करून नीरजने ही माहिती दिली. नीरजच्या लग्नाला त्याचे जवळचे मित्र आणि नातेवाईक उपस्थित होते. सुवर्णपदक विजेत्या नीरजच्या लग्नाची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. नीरजने त्याच्या पत्नीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.
नीरजने लग्नाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, “माझ्या कुटुंबासोबत आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरू झाला.” नीरजच्या लग्नात फक्त जवळच्या लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. त्याने कॅप्शनद्वारे त्याच्या पत्नीचे नावही उघड केले. नीरजच्या पत्नीचे नाव हिमानी आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरजने भारतासाठी भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्याचा हा विजय ऐतिहासिक होता. नीरज चोप्राने (Neeraj Chopra) भारतासाठी भालाफेकमध्ये अनेक पदके जिंकली आहेत. त्याने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये रौप्य पदक जिंकले. तर याआधी त्याने टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये सुवर्णपदक जिंकले होते. नीरजने 2023च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. त्याने 2023च्या जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत आणि 2018च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले आहे.
माझ्या कुटुंबासह जीवनाचा एक नवीन अध्याय सुरू केला.
आम्हाला या क्षणी एकत्र आणणाऱ्या प्रत्येक आशीर्वादाबद्दल कृतज्ञ. प्रेमाने बांधलेले, आनंदाने कधीही नंतर.
नीरज ♥️ हिमानी pic.twitter.com/OU9RM5w2o8
— नीरज चोप्रा (@Neeraj_chopra1) 19 जानेवारी 2025
महत्त्वाच्या बातम्या-
Champions Trophy; सूर्यकुमार यादवची भारताला उणीव भासणार, दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया
भारताने जिंकला खो-खो विश्वचषक..! फायनलमध्ये नेपाळचा धुव्वा उडवत रचला इतिहास
चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी यशस्वी जयस्वालला भारतीय संघात स्थान का? कर्णधाराने सांगितले कारण
Comments are closed.